• Thu. Mar 19th, 2026

    धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

    ByMH LIVE NEWS

    Nov 9, 2023
    धान खरेदीचा कालावधी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत

    मुंबई, दि. ९ :- पणन हंगाम २०२३-२४ करिता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात किमान आधारभूत  खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्यासाठी ९ नोव्हेंबर, २०२३ रोजी शासन आधारभूत निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत प्रसिद्धीपत्राद्वारे कळविण्यात आले आहे.

    धान व भरडधान्य खरेदीचा कालावधी  यामध्ये  खरीप पणन हंगामातील धान पिकाचा खरेदी कालावधी ९ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ तर भरडधान्याचा खरेदी कालावधी १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे.

    शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये म्हणून केंद्र शासनाने हंगाम २०२३-२४ करीता पुढीलप्रमाणे आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत.

    पिकाचे प्रकारआधारभूत किंमत (रुपये)शेतकऱ्यांना प्रदान करावयाची रक्कम (रुपये)
    धान /भातसाधारण (एफ.ए.क्यु.)२१८३२१८३
    अ दर्जा२२०३२२०३
    भरडधान्यज्वारी (संकरीत)३१८०३१८०
     ज्वारी(मालदांडी)३२२५३२२५
     बाजरी२५००२५००
     मका२०९०२०९०
     रागी३८४६३८४६

    ००००

    वंदना थोरात/विसंअ

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed