• Sat. Sep 21st, 2024
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अजितदादांचंच वर्चस्व, संचालकपदी विश्वासू मोहरा

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी रणजित अशोक तावरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचे विश्वासू मानल्या जाणाऱ्या मालेगाव बुद्रुक येथील रणजित तावरे यांना संधी मिळाली आहे. बारामती तालुक्यातील माळेगावच्या बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोक तावरे यांची बिनविरोध पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक पदी निवड झाली आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाचा अजित पवार यांनी राजीनामा दिला होता. बारामती तालुक्यातील अ वर्गातून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी राजीनामा दिल्याने पद रिक्त झाले होते.

सिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपद, आदेश बांदेकर यांचा कार्यकाळ संपला, शिंदे गटातील आमदाराची नियुक्ती
अजितदादांच्या जागेवर पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आज बँकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्या बैठकीत अजित पवार यांच्या सूचनेनुसार रणजित तावरे यांची संचालक पदी नियुक्ती करण्यात आली. बँकेचे चेअरमन दिंगबर दूर्गाडे यांनी सूचक तर दत्तामामा भरणे यांनी अनुमोदन दिले. ही निवड बिनविरोध झाल्याचे घोषित करण्यात आले.

भाजपसोबत जाण्याचा निर्णय जनतेने योग्य ठरवला, ग्रामपंचायत निकालानंतर अजितदादा गट उत्साही
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे गेले १७ वर्ष अध्यक्ष राहिलेले बाळासाहेब तावरे यांचे पुतणे रणजित अशोक तावरे हे आज बिनविरोध निवडणून आले आहेत. रणजित अशोक तावरे हे व्यवसायाने मोठे उद्योजक आहेत. पुण्यात त्यांची १५ टाटाची शोरूम आणि पेट्रोल पम्प आहेत. त्यासोबत छोटे मोठे व्यवसाय पण आहेत. त्यासोबत गेली ५ वर्ष ते राजहंस दूध संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहतात. बरोबरच प्रतिभा पतसंस्थेचे चेअरमन म्हणून दोन वर्ष काम पाहत आले आहेत.

उद्योगाचा मोठा व्याप आणि सहकार क्षेत्रातील जाणीव असणारे रणजीत अशोक तावरे यांचे आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाली आहे. रणजित तावरे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला जरी असला, तरी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर पवारांचंच वर्चस्व असणार आहे.

कर्जत-जामखेडमध्ये अजित दादांची सगळीकडूनच अडचण झाली, एकीकडून रोहित पवार, दुसरीकडे भाजपने अडकवलं

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed