• Mon. Nov 25th, 2024

    साताऱ्यातील प्रेम प्रकरणातील खूनप्रकरणी सहा जणांना अटक, पोलिसांनी २ तासांत लोकेशन शोधलं

    साताऱ्यातील प्रेम प्रकरणातील खूनप्रकरणी सहा जणांना अटक, पोलिसांनी २ तासांत लोकेशन शोधलं

    सातारा : कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील ओगलेवाडी परिसरातील राजमाची हजारमाची भागात प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचा खून झाला होता. याबाबत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्ह्यातील सहा संशयित आरोपींना कराड शहर डीबी पथकाने अवघ्या दोन तासात लोकेशन व गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली.

    याबाबत पोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपी बाबासाहेब पवार (रा. हजारमाची) यांची मुलगी राजमाची गावात राहणाऱ्या प्रवीण पवार याच्यासोबत पळून गेल्याचा संशय होता. या प्रकरणाची माहिती आरोपी बाबासाहेब पवार व त्यांच्या इतर साथीदार नातेवाईक यांना मिळाली होती. त्यामुळे संशयित आरोपी हे त्या युवकाचे मागावर होते. दि. ३० रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी बाबासाहेब याची मुलगी व युवक हे यशंवतराव चव्हाण कॉलेज परिसरातून पळून गेले. त्याचा राग मनात धरुन बाबासाहेब पवार (रा. हजारमाची) हा व त्याचे साथीदार यांनी युवकाचे वडील, भाऊ व पळून जाण्यास मदत केली, असा संशय असलेले मयत जनार्धन गुरव यांना राजमाची गावातून अपहरण करून सुर्ली घाटात नेऊन मारहाण केली. या मारहाणीत जनार्धन गुरव हा मृत्युमुखी पडल्याने संशयित आरोपी रानावनात पसार झाले होते. यांना कराड शहर डी. बी. पथकाने अवघ्या दोन तासात लोकेशन व गोपनीय माहितीनुसार सहा संशयित आरोपींना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

    या संशयित आरोपींना कराड शहर डी. बी. पथकाने अवघ्या दोन तासात लोकेशन व गोपनिय माहितीच्या आधारे एकूण सहा आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

    पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, कराड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डांगे, पोलीस उपनिरीक्षक पवार, सफी संजय देवकुळे, पोलीस हवालदार सचिन सूर्यवंशी, शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पोलीस शिपाई धिरज कोरडे, महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed