• Sat. Sep 21st, 2024
video : कार्यकर्त्याची फोटोची इच्छा, बॉडीगार्डने ढकललं, मुख्यमंत्र्यांना राग अनावर

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी नेहमीच कार्यकर्त्यांचा गराडा असतो. शिंदे यांच्यासोबत एक फोटो मिळवण्यासाठी कार्यकर्ते धडपडत असतात. अशाच एका कार्यकर्त्यांचा हट्ट पुरवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी ठाण्यातील खासगी निवासस्थानाबाहेर त्यांचा ताफा थांबवला. या कार्यकर्त्यांसोबत शिंदे यांनी फोटोही काढले. मात्र यावेळी फोटो काढताना कार्यकर्त्यांना हटकणाऱ्या सुरक्षारक्षकावर शिंदे चांगलेच चिडले. त्यांनी या सुरक्षारक्षकाला खडे बोलही सुनावले. त्यानंतर शिंदे यांचा ताफा मुंबईच्या दिशेने रवाना झाला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील लुईसवाडी येथील खासगी निवासस्थानातून बाहेर पडताच त्यांना कार्यकर्त्यांनी थांबवले. आमच्याकडे नवरात्रोत्सवात तुम्ही आला नाहीत, एक फोटो तरी आमच्यासोबत काढा, असा प्रेमळ हट्ट कार्यकर्त्यांनी केला.

शिंदे यांनीही कार्यकर्त्यांचे ऐकून त्यांच्यासोबत गाडीत बसूनच फोटो काढले. यावेळी शिंदे यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षकाने संबंधित कार्यकर्त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे चिडले. त्यांनी असे करण्यापासून सुरक्षारक्षकाला हटकले. त्यानंतर कार्यकर्त्यांची विचारपूस करत त्यांच्यासोबत सेल्फी काढून मुख्यमंत्र्यांचा ताफा मुंबईकडे निघाला.

कार्यकर्ते सुखावले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इतक्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत आमच्यासोबत फोटो काढल्याने आम्ही खरंच भारावून गेलो. मुख्यमंत्री नेहमीच कार्यकर्त्यांना भेटीसाठी प्राधान्य देतात. त्यांना कार्यकर्त्यांची जाण असल्याचे मत यावेळी या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

मनोज जरांगे पाटलांची खालावलेली प्रकृती पाहून बच्चूभाऊ अस्वस्थ, थेट मुख्यमंत्र्यांना फोन करुन चक्रं फिरवली
मुख्यमंत्र्यांनी स्वतः थांबवला ताफा

कार्यकर्त्यांची गर्दी पाहून निवासस्थाबाहेर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःहून चालकाला गाड्यांचा ताफा थांबवण्यास सांगितले. या कार्यकर्त्यांचा आग्रह ऐकून मुख्यमंत्र्यांनीच त्यांना फोटो घेण्यास सांगितले. असे असताना सुरक्षा रक्षकाने कार्यकर्त्यांना हटकलेले शिंदे यांना आवडले नाही. खुद्द मुख्यमंत्री शिंदे अनेकदा गर्दीत सर्वसामान्यांना फोटो काढण्यासाठी वेळ देतात. त्यांच्यासोबत एका फोटोसाठी अबालवृद्ध गर्दी करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed