• Sat. Sep 21st, 2024

दिवाळीत Online Shopping करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी; सावधगिरी बाळगा, नाहीतर व्हाल कंगाल

दिवाळीत Online Shopping करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी; सावधगिरी बाळगा, नाहीतर व्हाल कंगाल

मुंबई : अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपलेल्या दिवाळी सणासाठी बाजारात जोरदार खरेदी सुरू झाली आहे. यंदा ग्राहकांचा ऑफलाइनसह ऑनलाइन खरेदी उदंड प्रतिसाद लाभत आहे. कॅशबॅक, क्रेडिट कार्ड ऑफर, झटपट डिलिव्हरी, त्वरीत परतावा यांमुळे ऑनलाइन खरेदीला झुकते माप मिळत आहेत. सणासुदीच्या दिवसांत ऑनलाइन खरेदी करताना सध्या थोडी दक्षता घेतल्यास भविष्यातील मोठा मनस्ताप टाळता येणे शक्य होणार आहे.

– परतावा धोरण (रिटर्न पॉलिसी)

ऑनलाइन खरेदीतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे परतावा धोरण. एखादी वस्तू खरेदी केल्यास काही कारणास्तव ती बदलण्याची वेळ आली तर ती परत करता येणे गरजेचे आहे. ग्राहकांचा हा अधिकार आहे. वस्तू खरेदी करताना परतावा धोरण नक्की वाचावे. ते समजून घेतल्यास वस्तू परत करताना होणारी डोकेदुखी टाळता येणे शक्य आहे.

– प्रत्यक्ष छायाचित्र, समीक्षण

खरेदीदारांना आकृष्ट करून घेऊ शकेल असे छायाचित्र ऑनलाइन संकेतस्थळावर प्रदर्शित केले जातात. यामुळे अशा छायाचित्रांच्या प्रेमात पडून खरेदी करणे शक्यतो टाळावे. वस्तूखाली अन्य खरेदीदारांनी प्रत्यक्ष फोटो तसेच खरेदी केलेल्या वस्तूचे समीक्षण आवर्जून पाहावे. अलीकडच्या तारखेनुसार समीक्षण याचा सारासार विचार करूनच खरेदी व्यवहार पूर्ण करावे.

– विश्वसनीय संकेतस्थळाला प्राधान्य

मोठ्या प्रमाणात सवलतीचे आकडे दाखवणाऱ्या अनेक संकेतस्थळ सध्या सुरू आहेत. यापैकी अनेक संकेतस्थळ अज्ञात आणि असुरक्षित आहेत. यांच्या माध्यमाने खाते हॅक करून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे विश्वसनीय संकेतस्थळावरून खरेदीला प्राधान्य हवे.
तुमच्याकडे जमीन आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी; सातबारा उतारे झाले बंद, मिळणार ‘प्रॉपर्टी कार्ड’
इथे तक्रार करा…

-ऑनलाइन संकेतस्थळावरून फसवणूक झाली असेल, तर न्याय मिळवण्यासाठी ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करावी लागते. ग्राहक न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली तक्रार नोंदवू शकता.
-फोनवरच तक्रार करायची असल्यास केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (एनसीएच) क्रमांक १८००-११-४००० किंवा १९१५ या क्रमांकावर संपर्क करावा. (वेळ – सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत राष्ट्रीय सुट्टीचे दिवस वगळता सर्व दिवस ). ८८००००१९१५ हा व्हॉटसअॅप क्रमांक आहे.
-सायबर फसवणुकीसंदर्भात तक्रारींसाठी १९३० हा क्रमांक आहे.

सवलतींचा मोह टाळा

ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये एखादी लिंक पाठवून मोठ्या सवलतीचे तुम्हाला आमिष दाखवतात. लिंक तुम्हाला एका बनावट संकेतस्थळावर घेऊन जाते. हे संकेतस्थळ हुबेहूब खऱ्या पोर्टलसारखे भासते. मात्र प्रत्यक्षात ही बनावट असल्याने पैसे भरल्यानंतर लक्षात येते. या प्रकाराला फिशिंग म्हणतात. यामुळे ई-मेलवर आलेल्या अनोळखी हायपरलिंकवर क्लिक करणे टाळायला हवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed