• Sun. Sep 22nd, 2024

भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Nov 2, 2023
भ्रष्टाचार निर्मुलनासाठी दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन – महासंवाद

मुंबईदि. 02 : देशभर 30 ऑक्टोबर  ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. 

राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करतानाभ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागमुंबई विभाग91सर पोचखानवाला मार्गवरळी मुंबई येथे संपर्क करावा. तसेच टोल फ्री क्रमांक 1064दूरध्वनी क्रमांक 022-24921212संकेतस्थळ acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा ईमेल [email protected][email protected]फेसबुक www.facebook.com-maharashtra-ACB, मोबाईल ॲप acbmaharashtra.net, एक्स (ट्विटर) – @ACB_Maharashtra आणि 9930997700 या व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावाअसे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी केले आहे.

००००

नीलेश तायडे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed