• Sat. Sep 21st, 2024
ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा कुणाच्या वाट्याला जाणार? चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन पक्षांची नावं घेतली, म्हणाले…

कल्याण: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. लोकसभा संपर्क अभियान या कार्यक्रमासाठी शनिवारी संध्याकाळी कल्याण पश्चिमेत आले असून रविवारी डोंबिवली कल्याण पूर्व उल्हासनगर येथे जाणार आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये भाजप आणि शिंदे गटात सुरू असलेल्या धुसफुशीच्या अनेक घटना चव्हाट्यावर आल्या आहेत.
राज्यात नेत्यांना गावबंदी; मराठा समाजाच्या आंदोलकांची दादा भुसेंना भीती? बैठकीकडे फिरवली पाठ
आगामी लोकसभा निवडणुकीत ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा कोणाच्या वाट्याला जाणार? हा कळीचा मुद्दा झाला असून ठाणे आणि कल्याण लोकसभेची जागा मिळवण्यासाठी भाजप-शिवसेना शिंदे गट यात रस्सीखेच चालू आहे. यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसापूर्वी ठाण्यात प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, ठाणे आणि कल्याणच्या जागेची मागणी अद्याप कुणीही केलेली नाही. केंद्रीय समिती यावर निर्णय घेईल, असं बावनकुळेंनी सांगितलं. यातच आता कल्याण पश्चिमेत बावनकुळे यांनी पुन्हा पत्रकाराशी बोलताना ठाणे लोकसभेवर वक्तव्य केले आहे.

बावनकुळे यांनी सांगितले की, ठाणे लोकसभेच्या जागेसाठी भाजपचे कार्यकर्ते आम्हाला मिळावी अशी विनंती करत आहे. असे सांगत राष्ट्रवादीला ही जागा मिळावी असे वाटतं आहे असेही सांगितले, मात्र यात कुठेही शिवसेना शिंदे गटाचे नाव न घेतल्याने चर्चेला उधाण आले. ठाणे लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही लोकसभा आम्हाला मिळावी अशी विनंती आम्हाला करत आहेत. पण तरीही भाजपला वाटते आम्हाला मिळाली पाहिजे. राष्ट्रवादीला वाटते अजित दादांना मिळाली पाहिजे. शेवटी ज्याला मिळेल त्याला शेवटी जिंकायचं आहे. ४५ पुढच्या जागा घेऊन. त्यामुळे ज्याला जी जागा मिळेल तिथे भाजप ५१% ची लढाई लढेल, असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे कणेरी मठात; कोल्हापूरच्या दौऱ्याबाबत प्रचंड गुप्तता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी जिल्हाध्यक्षांनी पोलीस प्रशासन व प्रशासन सहकार्य करत नसल्याची खंत फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट व भाजपमधील पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. आमची जबाबदारी आहे सर्व मित्र पक्षांना समजून घ्यायचे. तसेच कल्याणमध्ये एकनाथ शिंदे मोठे भाऊ आहेत. ते भाजपच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याची आणि महाराष्ट्रात सांभाळून घेण्याची भूमिका घेत आहेत. हे आमच्या घरातले प्रश्न आहेत आणि घरात निपटून टाकू. एकनाथ शिंदे आणि आम्ही भाऊ भाऊ आहोत, थोडेसे गैरसमज असतील तर आम्ही मान्य करू आणि पुढे जाऊ, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed