• Wed. Nov 27th, 2024
    Latur Fire : दुकानात शॉर्टसर्किट झालं, चार मजली इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

    लातूर : लातूरमध्ये सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास एका इमारतीला अचानक भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहेत. लातूर शहरात छत्रपती शिवाजी चौकाजवळ शिवाजी लोंढे यांची व्यवसायिक व निवासी ‘शिवाई’ नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर देशमुख यांचे फुलविक्री व मंडप डेकोरेशनचे दुकान आहे. या दुकानात शॉर्टसर्किट होऊन सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली.

    काही क्षणांतच या आगीने उग्र रुप धारण केले आणि ही आग वरील दोन्ही मजल्यावर पोहचली. इमारतीमधून आगीचे आणि धुराचे लोट उठले. अशा परिस्थितीत काही समजायच्या आत या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर राहणारे शिवाजी लोंढे यांच्या कुटुंबियांना आग आणि धुराने लपेटले. पत्नी कुसुमबाई शिवाजी लोंढे (वय ८० वर्ष), मुलगा सुनिल शिवाजी लोंढे (वय ५८ वर्ष) आणि सून प्रेमिला सुनिल लोंढे (वय ५०) वर्ष यांचा या आगीत गुदमरून होरपळून मृत्यू झाला. मात्र याच इमारती राहत असलेल्या बीड येथील रहिवासी आणि लातूरमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत असलेली कु. अजरा अजिज सय्यद (वय २२) तिची आई जिनत फातेमा व भाऊ फहाद यांना आगीचे चटके बसून जखमी झाले.

    आईची भेट ठरली शेवटची, कांदिवलीच्या आगीत माजी IPL क्रिकेटपटूने गमावले दोन जीवलग
    या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या, वैद्यकीय पथक व पोलीस प्रशासन तातडीने दाखल झाले. अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिक्षक भागवत फुंदे, छञपती शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप सागर घटनास्थळी हजर झाले.

    Mumbai Fire :मुंबईतील आठ मजली इमारतीत भीषण अग्नितांडव, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू, तीन जण जखमी
    अग्निशमन दलाचे जवान बळिराम कांबळे, चंदु जाधव, आनंद शिंदे, ज्ञानेश्‍वर मगर, चंद्रकांत कोमडे, राधाकिशन कासले, मोसिन शेख, सोहेल शेख, सतिश खटाळ, प्रितम कांबळे, बसवराज स्वामी यांनी शर्थीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत काळाने लोंढे कुटुंबियांवर झडप घातली होती. या घटनेने लातूर शहरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा शिवाजी नगर पोलीस पंचनामा करत आहेत.

    बीडमध्ये १२ तासांत २ भीषण अपघात; १० जणांचा मृत्यू,बसचं नियंत्रण सुटलं तर रुग्णवाहिकेला ट्रकची धडक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed