मुंबई : तीन महिन्यांपूर्वी भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविषयी आक्षेपार्ह व्हिडीओ प्रसारित करून मानहानीकारक वक्तव्ये करण्यात आल्याच्या प्रकरणात सोमय्या यांनी ‘लोकशाही’ वृत्तवाहिनी तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व युट्यूबर अनिल थत्ते यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहेत. न्या. श्रीराम मोडक यांनी बुधवारी प्राथमिक सुनावणी घेतल्यानंतर प्रतिवादींना चार आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले.
जुलैमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीने सोमय्यांचा व्हिडीओ प्रसारित करून विविध प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करून आपली बदनामी केल्याचा आरोप करत सोमय्या यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
जुलैमध्ये ‘लोकशाही’ वृत्तवाहिनीने सोमय्यांचा व्हिडीओ प्रसारित करून विविध प्रश्न उपस्थित केले होते. मात्र, व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करून आपली बदनामी केल्याचा आरोप करत सोमय्या यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर, सोमय्या यांनी अॅड. आदित्य भट यांच्यामार्फत तीन याचिकांद्वारे स्वराज मराठी ब्रॉडकास्टिंग एलएलपी (लोकशाही वृत्तवाहिनी) व अन्य सहा जण, अंबादास दानवे आणि अनिल थत्ते यांच्याविरोधात हे अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहेत. त्यात त्यांनी प्रत्येक प्रतिवादीकडून १०० कोटी रुपयांच्या भरपाईची मागणी केली आहे.
‘सोमय्या हे विवाहित असून त्यांचे कुटुंब आहे. ते राजकीय व समाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक राजकीय नेत्यांचे घोटाळे बाहेर काढल्यानंतरच तो कथित व्हिडीओ उजेडात आला’, असे सोमय्या यांची बाजू मांडणारे अॅड. हृषिकेश मुंदरगी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर न्यायालयाने प्रतिवादींना उत्तर दाखल करण्याचे निर्देश देऊन सुनावणी तहकूब केली.
Read Latest Maharashtra News And Marathi News