सरकार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी विक्री व्हावी, यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे. परंतु धडगाव बाजार समितीकडून कुठलाही व्यवहार होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान आणि हाल होत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्याच्या पर्वत रांगेत दुर्गम भाग म्हणून ओळखला जाणाऱ्या धडगाव तालुक्यातील शेतकरी कष्ट करून शेती करत असतो शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा, यासाठी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला माल विक्रीसाठी आणत असतो. मात्र धडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्याच्या शेतीमाल खरेदी होत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे.
शेतकऱ्याचे सोयाबीन खरेदी होत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले आहे. सोयाबीन योग्य भावात खरेदी होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार, अशी भूमिका शेतकऱ्यांची कृषी उत्पन्न बाजार समिती दिसून येत आहे. धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी सोयाबीन घेऊन आलेला असून सकाळपासून कुठलाच व्यापारी आलेला नसल्याने आणि कित्येक वर्ष या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लिलाव व्यवहार होत नसल्याने शेतकऱ्यांना उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. धडगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही दुर्गम भागातील बाजार समिती आहे या ठिकाणी शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांना माल देत असतात जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे लायसन धारक व्यापारी आहेत तेच शहरात माल घेत असतात.
प्रशासनाला विनंती आहे की लिलाव आजपासून चालू करण्यात यावा जर व्यापारी ऐकत नसतील तर नोटीस बजावून त्यांचे लायसन रद्द करण्यात यावे आणि त्यांचे धडगाव शहरामध्ये जे दुकान आहेत. ते दुकान बंद करून त्यांनी या ठिकाणी दुकान थाटावं जेणेकरून त्याच्या गरीब शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. जर व्यापारी असे करत नसतील तर त्यांना दंड देण्यात यावा त्यांचे लायसन रद्द करण्यात यावे. धडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने याकडे जातीय लक्ष घालून कित्येक वर्ष थांबलेला व्यवहार आज पासून परत सुरू करावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.