• Mon. Nov 25th, 2024

    रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला,एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

    रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा गळा घोटला,एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर टीका

    मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आझाद मैदानात उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. आम्हाला मैदान नाही बाळासाहेब ठाकरे यांचा विचार महत्त्वाचा आहे. जिथं बाळासाहेबांचा विचार हेच आमचं शिवतीर्थ आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. या राज्यात शांतता राहावी म्हणून गेल्यावर्षी आम्ही बीकेसीत मेळावा घेतला. जिथं बाळासाहेबांचे विचार खुलेपणाने मांडता येतात तेच आपलं शिवतीर्थ, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    आम्ही हिंदुत्वासाठी सत्ता सोडली, हे सत्तेसाठी लाचार झाले, बाळासाहेबांनी ज्यांना आपल्याजवळ उभं करून घेतलं नाही त्यांच्यासोबत हे आज गेले. काँग्रेसचे जोडे हे आज उचलत आहेत हे अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

    आम्हाला एक फूल दोन हाफ म्हणणारे हे एक फुल एक हाफ, कधीही आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, हे कळणार नाही, असं एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तुम्ही कधीच मूठमाती दिलेली आहे. हिंदुत्वाशी बेईमानी तुम्ही केलेली आहे. कधी काँग्रेस, कधी समाजवादी आता पुढे एमआयएमसोबत युती करतील. पुढे हमासशी युती करतील, अशी टीका शिंदे यांनी ठाकरेंवर केली.

    शिवसैनिक जगला काय मेला काय त्यांना काय घेणं देणं नाही. मी माझं कुटुंब याच्या पलीकडे त्यांना घेणं देणं नाही. सुमंत रुईकर या शिवसैनिकाचा मृत्यू झाला होता. सुमंत रुईकर याच्या परिवाराच्या पाठिशी उभा राहिलो. त्यांच्या कुटुंबालआ धार दिला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांना जांना नाकारलं त्यांचे तळवे चाटायचे काम तुम्ही करत आहात, असं एकनाथ शिंदे म्हणाले. गर्व से कहो हम काँग्रेस के साथ हे असं म्हटलेलं तुम्हाला चालेल का, असा सवाल एकनाथ शिंदे म्हणाले.
    गेल्या दोन निवडणुकांमध्ये शिवसेना सोबत होती,यावेळी तुम्ही सत्तेतून पदच्यूत व्हाल, भास्कर जाधवांचा भाजपला इशारा
    हिंदुत्वाचा विचार घेऊन आपलं सरकार पुढं चाललंय असं असलं तरी इतर धर्मियांचा आपण सन्मान करतोय. इतर समाजाचा आपण सन्मान करतोय त्यांचाही आदर करतोय त्याचा सन्मान करत आपण पुढे जातोय अब्दुल सत्तार आपल्या कार्यकर्त्यांमध्ये बसला आहे. शिवसैनिक म्हणून साबीर शेख बाळासाहेब यांच्या काळात मंत्री होते हे आमचे हिंदुत्व आहे ही आमची शिवसेना आहे. सत्तेसाठी कधीही खुर्चीसाठी आम्ही तडजोड केली नाही करणार नाही आणि म्हणून आज अब्दुल सत्तार पण आमच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहे. स्वतः एसटीच्या गाडीमध्ये बसून कार्यकर्त्यांसोबत आले आणि ते कार्यकर्त्यांबरोबर बसले त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    शिस्तीत रहा बेट्या उडू नको ज्यादा, मी अंगार-भंगार नाय रं… धमकी देणाऱ्या मोहित कंबोजांना अंधारेंचा इशारा
    रक्ताचं नातं सांगणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा गळा घोटला आहे. त्यांची बांधिलकी फक्त पैशाशी आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे आल्यानंतर यांनी बँकेकडे ५० कोटी रुपये मागितले. बँकेने त्याला नकार दिले. त्यानंतर निर्लज्जाप्रमाणे त्यांनी माझ्याकडे पैसे मागितले. आमच्यावर ५० खोक्यांचे आरोप करता आणि आमच्याकडेच ५० कोटींची मागणी करता. आम्ही क्षणाचा विलंब न लावता ५० कोटी द्यायला सांगितले. तुमचे प्रेम हे बाळासाहेबांच्या विचारावर नाही तर पैशावर आहे. त्यामुळे मी एका क्षणाचाही विचार न करता ते पैसे दिले, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

    आंतरवाली सराटीत लाठीचार्ज करण्याचा आदेश देणारा डायर कोण? मनोज जरांगे पाटलांनी सावध राहावं,उद्धव ठाकरेंचं आवाहन
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed