• Mon. Nov 25th, 2024

    मामा आणि भाची लग्न करु शकतात का? नागपुरच्या न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलेचा पोटगीचा दावा फेटाळला

    मामा आणि भाची लग्न करु शकतात का? नागपुरच्या न्यायालयाचा मोठा निर्णय, महिलेचा पोटगीचा दावा फेटाळला

    नागपूर: हिंदू विवाह कायद्यानुसार समाजात संबंधित परंपरा नसल्यास मामा-भाचीचे लग्न होऊ शकत नाही. लग्नासाठी हे निषिद्ध नाते आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्याचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी एका प्रकरणात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील भाची सविता (३८) हिने मामा अमरदास (५६) यांच्याशी लग्न केल्याचा दावा केला आणि पोटगी मागितले. मात्र तिची मागणी न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. हिंदू विवाह कायद्याच्या कलम ५(४) नुसार, समाजात परंपरानसल्यास प्रतिबंधित नातेसंबंधात विवाह होऊ शकत नाही.
    दिव्यात भाजपला धक्का; शिंदे गटाचे कट्टर विरोधक रोहिदास मुंडे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंंच्या उपस्थितीत प्रवेश
    लग्नासाठी मामा-भाचीचे नाते निषिद्ध आहे. तसेच, कलम ५(१) नुसार, पहिला विवाह कायम असल्याने दुसरा विवाह केला जाऊ शकत नाही. सविताचे अमरदासशी लग्न झाले तेव्हाही तिचे पूर्वीचे लग्न कायम होते. त्यामुळे या दोन्ही तरतुदींनुसार सविता आणि अमरदास यांचा विवाह सुरुवातीपासूनच अवैध ठरतो. त्यामुळे अमरदास सविताला पोटगी देण्यास जबाबदार नाहीत, असे या निकालाने स्पष्ट केले आहे. सविताने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पोटगीसाठी अर्ज केला होता, मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे सत्र न्यायालयात अपील दाखल करण्यात आले, तेही फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

    मराठ्यांनी अफगाणिस्तानपर्यंत झेंडे लावले, सरकारचा कार्यक्रम करतील; जरांगेंचा इशारा

    अमरदास यांचा विवाह कविताशी झाला होता. कविता लहान असल्याने तिला सासरच्या घरी पाठवले नाही. याचा फायदा घेत अमरदासने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यामुळे कविता आणि अमरदास यांचा घटस्फोट झाला. तर आजारपणामुळे सविताला सासरच्यांनी घरातून हाकलून दिले, परिणामी ती माहेरी गेली. यानंतर सविताचा अमरदासशी जबरदस्तीने विवाह करण्यात आला. त्यावेळी अमरदास याचा दुसऱ्या मुलीशी विवाह कायम होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *