• Tue. Sep 8th, 2026
बारामतीत पुन्हा शिकाऊ विमान कोसळले; रेल्वे स्टेशनपासून जवळचं दुर्घटना, नेमकं काय घडलं?

बारामती: बारामती तालुक्यातील कटफळ येथे एमआयडीसी मधील रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेचे विमान गुरुवारी (दि. १९ ) रोजी दुपारी ३ वाजता कोसळले. सुदैवाने यात कोणतीही जिवितहानी झाली नाही. बारामतीतील विमानतळावरून टेकऑफ घेतल्यानंतर विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले आहे. ते नक्की कशामुळे कोसळले, त्याची मात्र माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
गरबा खेळताना दंड थोपटला; दोन गटात वाद, नंतर तरुणाला भेटण्यास बोलवलं, अन् नको ते घडलं
बारामतीत गेल्या काही वर्षांपासून विमान प्रशिक्षण संस्था त्यांचे प्रशिक्षण कार्यालय चालवत आहेत. बारामती विमानतळाचा त्यासाठी वापर होतो. काही महिन्यांपूर्वी इंदापूर तालुक्यातील एक शिकाऊ विमान कोसळले होते. यावेळी विमानाचे नुकसान झाले होते. त्यातील महिला पायलट प्रशिक्षणार्थी बचावली होती. ती घटना ताजी असतानाच आता दुसऱ्या एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

साताऱ्यात मनोज जरांगेंची सभा, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून सभास्थळाची पाहणी

अपघात झाल्यावर विमानाचे अवशेष झाकून ठेवण्यात आले. विमान कोणत्या संस्थेचे आहे हे कळू नये, हे कारण त्यामागे असावे, किंवा सुट्टे भाग चोरीला जावू नयेत, ही भूमिका त्यामागे असावी. विमान कोसळल्याच्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. वैमानिक प्रशिक्षक शक्तीसिंग आणि इतर सहकारी किरकोळ जखमी झाले असून त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed