• Mon. Nov 25th, 2024

    दुकान तोट्यात, इन्शुरन्सचे पैसै मिळवण्यासाठी मित्रांच्या मदतीने रचला डाव, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

    दुकान तोट्यात, इन्शुरन्सचे पैसै मिळवण्यासाठी मित्रांच्या मदतीने रचला डाव, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

    स्वप्निल एरंडोल, सांगली : स्वतःचे दुकान तोट्यात चालले असल्यामुळे मित्रांच्या मदतीने इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी आपल्याच दुकानात चोरी झाल्याचा बनाव करणाऱ्या दुकान मालकाचा भांडाफोड करत दोघांना अटक केली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने १०० फुटी रोडवरील व्हाईट हाऊस जवळ आज शनिवार दि. १४ रोजी दुपारी सदरची कारवाई केली. या प्रकरणी दुकानमालक आकाश प्रकाश सूर्यवंशी (वय २६ रा. इनामधामणी) आणि अक्षय संजय बोगारे (वय २९ रा. विजयनगर) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ७२ हजार ६७६ रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    याबाबत अधिक माहिती अशी की, संशयित आकाश सूर्यवंशी यांचे विश्रामबाग परिसरातील गणपती मंदिराजवळ असणाऱ्या देवल कॉम्प्लेक्समध्ये शूज इन बॉक्स या नावाने स्पोर्ट्सच्या साहित्यांचे दुकान आहे. बुधवार दि. ०५ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून त्यातील अडीच लाखांचे स्पोर्ट शूज चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिली होती.

    कानातून रक्त येईपर्यंत चिमुकलीला मारहाण; शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

    स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक आज शनिवार दि. १४ ऑक्टोबर रोजी शहरात ऑलआऊट ऑपरेशन राबवत होते. यावेळी पथकातील सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, हेडकॉन्स्टेबल दरिबा बंडगर, विक्रम खोत यांना १०० फुटी रोडवरील व्हाईट हाऊस जवळ संशयित दोघेजण मोटारसायकलवर पांढरे पोते घेऊन उभारलेले दिसले. त्यांच्यावर संशय आल्याने कसून चौकशी करत तपासणी केली असता पोत्यामध्ये स्पोर्ट शूज आढळले. या शूज बाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, संशयित आणि त्यांचे मित्र शाम अलौकी, विजय खुटाळे (दोघे रा. कळंबा ता. करवीर) यांच्या मदतीने दुकानात चोरी केली होती.

    सदरची चोरी त्यांचा मित्र दुकान मालक आकाश सूर्यवंशी याने दुकान तोट्यात चालले असल्याने इन्शुरन्स कंपनीकडून पैसे मिळवण्यासाठी केल्याचे सांगितले. यावेळी सूर्यवंशी यांच्याकडे चौकशी केली असता त्यानेही सदरची कबुली दिली. यावेळी त्याच्याकडून २२ हजार ६७६ रुपयांचे स्पोर्ट शूज आणि मोटारसायकल असा ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सिकंदर वर्धन, पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, हेडकॉन्स्टेबल दरिबा बंडगर, विक्रम खोत, बिरोबा नरळे, अमर नरळे यांनी केली.

    सुट्टी न देणं पडलं महागात; सोलापूरच्या शिक्षकाने मुख्याध्यापकांना चोपलं, कारवाईची मागणी

    Read Latest Sangli News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed