श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा उघडण्याची मागणी भाविक व स्थानिक पुजारी यांच्याकडून वारंवार होत असल्यामुळे विश्वस्त समितीची सभा दि.२० सप्टेंबर २०२३ रोजी ठराव क्रमांक १७.०१ अन्वये श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा भाविकांसाठी खुला करण्यात यावा असे सर्वानुमते ठरले. त्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव मंदिराकडील दरवाजा दिव्यांग आणि वयोवृद्ध भाविकांना मंदिरात प्रवेश करणे व बाहेर जाण्यासाठी उघडण्यात यावा. तर या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येवून या मार्गावर रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था करावी. तसेच या दरवाज्यावर सकाळी चरणतीर्थ झाल्यापासून रात्री प्रक्षाळ होईपर्यंत २ सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावेत, असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तुळजाभवानी मंदिरातील टोळभैरव दरवाजा उघडण्यात आला आहे.
एटीएस आणि एसआयडी यांनी अहवाल दिला होता. हा दरवाजा मंदिराच्या बाजुला असल्यामुळे सुरक्षेच्या कारणावरुन बंद करण्यात आला होता. काल दरवाजा उघडला आहे. याला आमची परवानगी नाही. जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आहेत. हा विषय त्याच्या अखत्यारितला आहे.आम्ही पुन्हा अहवाल पाठवणार आहोत, असं धाराशिवचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी म्हटलं आहे.
फार वर्षापूर्वी पोलीसांनी मंदिरात तपासणी केली होती. त्यावेळी मंदिरात अतिरेकी आले अशी अफवा पसरली होती. प्रत्यक्षात तसे घडलेच नव्हते फक्त अफवा होती, सदरील दरवाजा बंद करण्याचे आदेश कोणी दिले होते.हे आम्हाला अदयाप पर्यंत माहित नाही. केवळ अफवेमुळे हा दरवाजा गेली अनेक वर्षे बंद होता, पाळीकर पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी म्हटलं आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News