• Sat. Sep 21st, 2024

वंचितचा इंडिया आघाडीतील सहभाग ते अजित पवारांचं मुख्यमंत्रिपद, शरद पवार स्पष्टपणे म्हणाले…

वंचितचा इंडिया आघाडीतील सहभाग ते अजित पवारांचं मुख्यमंत्रिपद, शरद पवार स्पष्टपणे म्हणाले…

अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीतील सहभाग आणि छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्य आणि राष्ट्रवादीची निवडणूक आयोगातील सुनावणी यावर भाष्य केलं. आमची बैठक झालेली नाही, इंडियाची बैठक होणार आहे, नागपूर किंवा इतर कुठेतरी बैठक होणार आहे. ती बैठक ठरल्यानंतर सर्व पक्ष मिळून इंडिया आघाडीतील वंचितच्या सहभागाबाबत निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले. वंचितच्या प्रवेशाचा निर्णय सामुहिक होईल, असं शरद पवार म्हणाले.

आमचा आग्रह हा राहील की, जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचं राज्य यावं, अशी आमची भूमिका आहे. जनमानसात आमचा परिणाम दिसतोय त्याचं मतामध्ये परिवर्तन झालं तर सत्ता येईल, असं शरद पवार म्हणाले.

भाजपसोबत जावं हा आग्रह काही लोकांचा होता, असं शरद पवार म्हणाले. छगन भुजबळ यांचा प्रस्ताव सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करावं असा होता. छगन भुजबळ तुम्ही जिकडे आहात तिकडे मी आहे असं म्हणाले होते. त्यानंतर ते दुसऱ्या बाजूला गेले, असं शरद पवार म्हणाले. अजित पवार मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार घालणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यासंदर्भात विचारलं असता शरद पवार यांनी ते स्वप्न असून ते घडणार नसल्याचं म्हटलं.

आई-बाबा रागवताच बारामतीत १२ वर्षीय मुलाचं भयंकर कृत्य, पण डॉक्टरांनी देवदूत होत वाचवले प्राण!
देशाचं चित्र हे भाजपच्या विरोधी आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा या राज्यात भाजपची सत्ता नाही. गोव्यात नव्हतं, तिथं फोडाफोडी करुन राज्य आलं. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, तिथं फोडाफोडी करुन सत्तेत आले. गुजरात भाजपकडे आहे. मध्य प्रदेशमध्ये फोडाफोडी करुन सत्तेत आले. राजस्थान, पंजाब, बिहार, पश्चिम बंगालमध्ये भाजप नाही. देशाची यादी बघितली तर ७० टक्के राज्यात भाजप नाही. यापुढेही अशीच स्थिती होईल, असं शरद पवार म्हणाले.
रोहितच्या विक्रमी शतकात टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड कोणाच्या लक्षात आला नाही; वर्ल्डकपच्या इतिहासात आजवर कोणाला असे जमले नाही
भाजपकडं मोठ्या प्रमाणावर राज्य राहिली नाहीत तर लोकसभेत त्याचा परिणाम दिसून येईल, असं शरद पवार म्हणाले. लोकसभेसाठी इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदाचा चेहरा असावा असं काही नाही. १९७७ ला देखील लोकांपुढं चेहरा नव्हता. परिवर्तन पाहिजे पर्याय पाहिजे अशी लोकांची भूमिका होती. आता देखील विविध राज्यात लोकांची भाजप नको पर्याय हवा अशी भूमिका असल्याचं शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar: तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचंय, शाळेत गौतमी पाटीलचा धडा द्यायचा का; शरद पवारांचा सवाल
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed