• Tue. Nov 26th, 2024

    अजगराच्या पोटात सापडली लोखंडी तार, डॉक्टरांकडून ऑपरेशन फत्ते पण प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

    अजगराच्या पोटात सापडली लोखंडी तार, डॉक्टरांकडून ऑपरेशन फत्ते पण प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?

    चैत्राली चांदोरकर, पुणे : शिकार करताना अजगराच्या पोटात शिरलेली लोखंडी तार शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढण्यास पुण्यातील पशुवैद्यकीय तज्ज्ञांना यश आले आहे. अजगराची तब्येत सध्या गंभीर असून पुढील काही दिवस त्याला वैद्यकीय देखरेखी खाली ठेवण्यात येणार आहे.

    पुणे वन विभागाबरोबर काम करणाऱ्या रेस्क्यू चॅरिबेटल ट्रस्टच्या वन्यप्राणी उपचार केंद्रामध्ये ही शस्त्रक्रिया करण्यात आली. वनाधिकाऱ्यांनी दापोलीतून या अजगराला उपचारांसाठी पुण्यात आणले होते. अजगराला सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली केंद्रात ठेवण्यात आले आहे.

    दापोली येथील एक ग्रामस्थाला सोमवारी शेतात भारतीय अजगर (इंडियन रॉक पायथन) आजारी अवस्थेत आढळला. माहिती मिळताच सर्पमित्र अजगराला घेऊन जाण्यासाठी आले. मात्र अजगराने पोटातून टोकदार लोखंडी तार बाहेर आलेली दिसली.

    ड्रग्ज माफिया ललित पाटील पळून जाण्यात मंत्री दादा भुसे यांचा हात, सुषमा अंधारे यांचा सनसनाटी आरोप
    वनाधिकाऱ्यांना अत्यवस्थ अवस्थेत सापडलेल्या अजगरावर उपचार करताना पशुवैद्यकीय तज्ज्ञांना त्याच्या पोटात मोठी लोखंडी तार सापडली. पोट छेदून ही तार बाहेर आली होती, योग्य वेळेत झालेल्या शस्त्रक्रियेमुळे जगराचे प्राण वाचविण्यास यश आले आहे. काही वेळातच दापोली वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुण्यातील रेस्क्यू ट्रस्टशी संपर्क साधला. रात्री उशिरा अजगराला उपचारांसाठी पुण्यात आणले. सोमवारी रात्रीच संस्थेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी त्याची शस्त्रक्रिया करून लोखंडी तार बाहेर काढली. त्यानंतर सापाला बरे होण्यास मदत करण्यासाठी वेदनाशामक औषधे देण्यात आली.

    अजगर आता शुद्धीत आले असून थोड्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र त्याच्या जखमांची तीव्रता लक्षात घेता, प्रकृती गंभीर आहे. औषधांला त्याचा प्रतिसाद कसा आहे, हे बघण्यासाठी आम्ही पुढील काही दिवस त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवणार आहोत, असे पशूवैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

    लेक लाडकी योजना: सरकार मुलींना लखपती करणार, पोरीच्या जन्मानंतर एक लाख मिळणार, कधी आणि कसे? वाचा…
    दरम्यान, रेस्क्यू सेंटरचे वन्यजीव व्यवस्थापन विभागाचे संचालक तुहिन सातारकर म्हणाले, “अलीकडे वन्यजीवांना भेडसावणाऱ्या समस्यांमध्ये, त्यांच्या पोटात जाणाऱ्या घातक वस्तू हा गंभीर विषय झाला आहे. अनेक ठिकाणी वन्यप्राणी कचऱ्यातून त्यांचे खाद्य शोधत असताना, तसेच जंगलांमध्ये ठिकठिकाणी फेकला जाणारा कचऱ्यातून जाताना कळत नकळत अविघटनीश पदार्थ खातात. यातून त्यांना गंभीर आजार आणि शरीराच्या आतील बाजूस दुखापतही होते. कचरा व्यवस्थापनाबद्दल गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *