• Sat. Sep 21st, 2024
व्यक्तीच्या निधनानंतर कुटुंबाचा मोठा निर्णय; रुग्णालयात ग्रीन कॉरिडोर अवयवदान, अन् तिघांना जीवनदान

नांदेड: ब्रेन डेड झालेल्या एका ७३ वर्षीय व्यक्तीचे अवयव नेण्यासाठी रविवारी नांदेडमध्ये ग्रीन कॉरिडोर करण्यात आले. एक लिव्हर आणि एक किडनी हे छत्रपती संभाजीनगर आणि दूसरी किडनी नांदेडच्या ग्लोबल हॉस्पिटल तर दोन डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात येणार आहे. कुटुंबियांनी घेतलेल्या अवयवदानाच्या निर्णयामुळे तिघांना जीवनदान आणि दोघांना दृष्टी मिळणार आहे.
चक्क पालकांनीच शाळेला कुलूप ठोकलं; प्रशासनाला ग्रामस्थांचा सज्जड दम, नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वजीराबाद भागातील रहिवासी सूर्यकांत साधू (७२) हे चक्कर येऊन पडल्याने ते मागील चार दिवसांपासून अत्यवस्थ होते. त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने कुटुंबियांनी त्यांना शुक्रवारी ग्लोबल हॉस्पीटलमध्ये दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान त्यांचा ब्रेन डेडमुळे मृत्यू झाला. त्यांचा मुलगा डॉ. दिपक साधू यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला. कुटुंबियांतील इतर सदस्यांनी देखील अवयव दानाला समर्थक दिले. या निर्णयानंतर रुग्णालयाने ग्रीन कॉरिडोर करण्याची तयारी सुरु केली. छत्रपती संभाजीनगर येथील कमल नयन बजाज आणि एमजीएम रुग्णालयातील डॉक्टराची टीम रविवारी सकाळी नांदेडला दाखल झाली.

पावसाळ्यात जंगलात येणाऱ्या रानभाजीची शेती, शेतकऱ्याला लाखोंचं उत्पन्न

एक लिव्हर कमल नयन बजाज हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तर एक किडनी एमजीएम रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी विमानाने नेण्यात आले. तसेच दोन डोळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयात आणि एक किडनी प्रत्याारोपणासाठी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आली. ग्लोबल रुग्णालय ते विमानतळपर्यंतचा अंतर हे पाच किलो मिटरचा आहे. पाच किलोमीटरचे अंतर हा साधारणता १५ मिनिटात कापला जातो. मात्र ग्रीन कॉरिडोरमुळे चार मिनिट ३ सेकंद लागला. नांदेडमध्ये हे पाचवे ग्रीन कॉरिडोर आहे. २०१६ मध्ये पहिल्यांदा ग्रीन कॉरिडोर करण्यात आलं होतं. तेव्हापासून अवयव दानाला सुरुवात देखील झाली होती. अवयवदान हे श्रेष्ठदान असतं. त्यातच एका डॉक्टर मुलाने आपल्या वडिलाचे अवयव दानासाठी दाखवले समर्थता हे नक्की कौतुकास्पद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed