• Mon. Nov 25th, 2024
    नागपुरकरांनी फडणवीसांची गाडी अडवली; सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या- …तर ही वेळ आली नसती

    पुणे: बारामतीतील गणपती मंडळांना भेट देण्यासाठी आलेल्या सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी नागपूरमध्ये फडणवीस यांची गाडी अडवली, यावर प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या एक लोकप्रतिनिधी म्हणून देवेंद्र फडणवीस असो किंवा अन्य कोणीही गाडी अडवून जाब विचारुन त्यांच्याकडे न्याय मागितला पाहिजे. परंतू गाडी अडवून त्यांना त्रास देणे योग्य नाही. ते कोणत्याही पक्षाचे असले तरी परंतू एक गोष्ट मान्य केली पाहिजे की भारतीय जनता पक्षाचे नेते पक्ष फोडणे, घर फोडणे, सीबीआय ईडी सारख्या एजन्सीचा वापर करणे यामध्ये एवढे मग्न आहेत की त्यांना विकास करायला वेळ कुठे मिळतो. हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी पक्ष फोडणे ऐवजी विकास कामांकडे लक्ष दिले असते तर ही वेळ नागपूरकरांवर आली नसती. नागपूरकरांकडे हा दिवस आला नसता. देशात आणि राज्यात अनेक विषय आहेत. मणिपूर, कॅनडा, महागाई बेरोजगारी एवढे सगळे प्रश्न असताना सुद्धा भाजप फक्त कटकारस्थानावर भर देतो. आपण सगळ्यांनी नागपूरच्या मदतीसाठी ताकदीने उभे राहिले पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.
    शंभर वर्षांपासून भजनाच्या गजरात बाप्पांना निरोप देतात; ‘या’ गावाने जपलीय एकत्र मिरवणुकीची परंपरा
    नव्या संसद भावना विषयी सुप्रिया सुळे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, सरकारने अधिवेशन बोलावले तेव्हा आम्हाला वाटले होते की काहीतरी मोठा निर्णय होईल. कर्जमाफी होईल शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काहीतरी मोठं काम होईल किंवा एखादा मोठा निर्णय होईल त्यावेळी मोदीजींनी आम्हाला जर काही कटूता राहिले असेल तर सोडून द्या असं सांगितलं. तेव्हा सगळे पक्ष एकमताने त्यांच्या बरोबर उभे राहिले. परंतू प्रत्यक्षात असं काहीच घडलं नाही. उलट अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा महिला खासदार बोलायला उठल्या तेव्हा भाजप खासदारांनी त्यांचा अपमान केला. त्यांनी महिला विधेयक आणले त्याला आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला. पण नंतर कळले हा एक जुमला आहे. हा पोस्ट डेटेड चेक असल्यासारखाच हा विषय होता.

    झाल्या तिन्ही सांजा… सुप्रिया सुळेंनी सुरात सूर मिसळला, लावणीचा आनंद घेतला

    त्या पुढे म्हणाल्या की, दुसऱ्या दिवशी महिला बोलायला उभे राहिल्या की भाजपचे खासदार भाषण सुरू व्हायच्या आधीच वाईट वागणूक देत होते, घोषणा देत होते. नवीन संसदेत आम्ही अपेक्षणीय गेलो होतो. मला जुनी संसद आवडते. देशाचा सगळा इतिहास जुन्या संसदेशी निगडीत आहे. अनेक भावना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सुनेत्रा पवार तुमच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत असे विचारलं तर त्या म्हणाल्या, आमच्याकडून तरी लोकशाही आहे. दिल्लीत काय दडपशाही चालते हे सगळा देश बघतो. कोणीतरी माझ्या विरोधात लढणार ना? आपण सगळ्यांनी याचा मान सन्मान केला पाहिजे. ३ वेळा भाजप माझ्या विरोधात लढला आहे. आताही लढणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed