• Sat. Sep 21st, 2024
श्रीरामपूर दरोडा प्रकरणाला धक्कादायक वळण; पत्नीनेच पतीला संपवलं अन् केला बनाव, पोलीस तपासात फुटले बिंग

अहमदनगर: अहमदनगरमधील दरोड्याच्या गुन्ह्याला आता वेगळे वळण लागले आहे. सतत होणाऱ्या शारीरिक त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीला दुधात झोपेच्या गोळ्या देऊन नंतर साडीच्या साह्याने पतीचा गळा आवळून संपवल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. विशेष म्हणजे पत्नीने दरोड्याचा बनाव रचत दरोडेखोरांनी आपल्या पतीची हत्या करत ७ लाखांची रोकड घेऊन लंपास झाल्याचा बनाव केला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की,२१ सप्टेंबर रोजी रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास कोल्हार रोड, एकलहरे शिवार येथे नईम रशिद पठाण यांचे घरी दरोडा पडला असुन त्याचे घरुन सात लाख रु. रोख रक्कम व काही दागिने चोरी गेले आहेत, सदर दरोड्यामध्ये नईम पठाण यांना साडीच्या साहयाने गळफास लावुन जिवे ठार मारले आहे आणि त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे तरी तात्काळ मदत पाठवा असा श्रीरामपुर पोनि. हर्षवर्धन गवळी यांना कॉल आला. पोनि. गवळी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तत्काळ तपास पथक व अधिकारी अंमलदार याचेसह सदर घटनास्थळी जावुन पाहणी केली आणि जखमींना तात्काळ औषध उपचाराकरीता पाठवून दिले.

सदर घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली. सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं.१०१४/२३ भादंवि ३९४,३९६ प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास चालु केला. तसेच एस.पी. राकेश ओला यांचे आदेशाने एल्सीबी पोनि. दिनेश आहेर हे पथकासह सदर गुन्हाचा समांतर तपास करण्यासाठी घटनास्थळी हजर झाले. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचा तपास चालू असताना, सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण करुन तसेच सदर दरोड्यात मयत झालेला नईम रशिद पठाण याची जखमी पत्नी हिचे जाब जबाब घेतले असता आणि गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा दरोडा नसून मयत नईम पठाण याची पत्नी बुशरा नईम पठाण (रा.एकलहरे) हिने केला असलेबाबत समजल्याने तिस मयत नईम रशिद पठाण याचा अंत्यविधी होताच चौकशीसाठी ताब्यात घेतले.

पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या, गावकऱ्यांनी हलगी वाजवून गावात मिरवणूक काढली

सदर गुन्ह्याबाबत मयताची पत्नी महिला बुशरा नईम पठाण हिच्याकडे सखोल तपास केला असता तिने प्रत्येकवेळी वेगवेगळी माहिती सांगून पोलिसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला उडवाडवीची उत्तरे दिली. सदर महिलेस पोलिसांनी विश्वासात घेवून विचारपुस केली असता, तिने माझा पती नईम रशिद पठाण हा मला सुमारे पाच ते सात वर्षापासुन नेहमी सेक्स्युएल टॉर्चर करत होता, याच रागातुन मी माझे पती नईम पठाण याच्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या टाकून त्यास गुंगी आल्यानंतर साडीचे एक टोक घराचे खिडकीचे गजास बांधुन साडी त्याचे गळ्यास आवळुन साडीचे दुसरे टोक दोन्ही हाताने ओढुन त्याला जीवे ठार मारले आहे. आमचे घरातील कोणतेही पैसे अगर दागिने चोरी गेले नाही अशी कबुली दिल्याने तिला सदर गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली एल्सीबी पोनि.दिनेश आहेर यांचे पथकातील सफौ/ बाळासाहेब मुळीक, पोहे काँ मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोना,ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, रवींद्र कर्डिले, पोकॉ/ सागर ससाणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चालक पोहेकॉ गावडे, मपोकॉ/ मिरा सरग, तसेच पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर हर्षवर्धन गवळी, यांचेकडील तपास पथकातील सपोनि.जे.बी. बोरसे, पोसई ,समाधान सोळंके, पोसई/दादाभाई मगरे, मपोसई सुरेखा देवरे, पोहेकॉ शफिक शेख, चालक पोहेकॉ/राजेश सुर्यवंशी, पोना रघुवीर कारखेले, रामेश्वर ढोकणे, विरअप्पा करमल, पोका/ राहुल नरवडे, गौतम लगड, संपत बडे, हरिभाऊ पानसबळ, गणेश गावडे, रमिझराजा अत्तार, भारत तमनर, मच्छिद्र कातखडे, संभाजी खरात, नंदु लोखंडे, आकाश वाघमारे, योगिता निकम, होमगार्ड /सर्फराज जहागिरदार, तसेच अॅडीशनल ऑफीसचे पोना/सचिन धनाड,पोकॉ/आकाश भैरट यांनी केली असून दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे करीत आहेत.

गांजा शेतीवर पोलिसांची धडक कारवाई, झाडे उपटण्यासाठी मजूरांचा ताफा; बाजारात कोट्यवधींची किंमत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed