• Mon. Nov 25th, 2024

    मुंबईत तरुण मैत्रिणीच्या घरात घुसला, तिच्यासह आईवरही चाकूहल्ला; थराराने शहरात खळबळ

    मुंबईत तरुण मैत्रिणीच्या घरात घुसला, तिच्यासह आईवरही चाकूहल्ला; थराराने शहरात खळबळ

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : चेंबूरच्या शेल कॅालनी परिसरात वास्तव्यास असलेल्या मायलेकींवर त्यांच्या परिचयातील राहुल निषाद या तरूणाने घरात घुसून चाकूहल्ला केला. या हल्ल्यातून बचावासाठी दोघी घराबाहेर पळाल्यानंतर राहुल याने स्वतःवर चाकूने वार करून घेतले. या घटनेत राहूल याचा मृत्यू झाला तर जखमी मायलेकींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

    शेल कॅालनी राहणाऱ्या मायलेकींच्या राहुल हा परिचयाचा होता. तरूणीचा चांगला मित्र होता. सायंकाळच्या सुमारास घरामध्ये दोघीच असल्याचे पाहून राहुल चाकू घेऊन घरात शिरला. त्याने आतून दरवाजाची कडी लावली आणि दोघींवर चाकूने वार करण्यास सुरूवात केली. दोघींनी कसाबसा त्याचा प्रतिकार केला आणि काही वार झेलल्यानंतर दोघीही दरवाजा उघडून घराबाहेर पडण्यास यशस्वी झाल्या. दोघींनी घराबाहेर जाऊन आरडाओरड केली. आजूबाजूचे जमा होत असल्याचे पाहून राहुल याने स्वतःवर चाकूने वार करून घेतले.

    Pune News : पुणेकरांना दिलासा मिळणार; वाहतूक कोंडी, अस्वच्छतेपासून मुक्तीसाठी आठवडी बाजाराबाबत कडक निर्णय

    दरम्यान, घटनेची माहीती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जखमी अवस्थेत असलेल्या मायलेकी आणि राहुल यांना तत्काळ रूग्णालयात नेले. राहुल याचा दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला तर मायलेंकीवर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *