• Mon. Nov 25th, 2024

    ६०० वर्षापासूनचा ऐतिहासिक वारसा; एका अख्या गावामध्ये एकच गणपती, गावाची महाराष्ट्रभर चर्चा…

    ६०० वर्षापासूनचा ऐतिहासिक वारसा; एका अख्या गावामध्ये एकच गणपती, गावाची महाराष्ट्रभर चर्चा…

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील “कोईळ ” गावाला ऐतिहासिक वारसा आहे. गेले ६०० वर्षांपासून कोईळ गावांमध्ये “एक गाव” एक गणपती” ऐतिहासिक संकल्पना राबवली जात आहे .या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणेश चतुर्थीला प्रत्येकाच्या घरी गणेश मूर्तीचं पूजन केले जात नाही.ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.

    तळकोकणातील मालवण तालुक्यातील “कोईळ” गावात ‘एक गाव एक गणपती’ अशी पारंपरिक पद्धत प्राचीन काळापासून सुरू आहे.ही परंपरा गावकरी अगदी मनापासून पालन करताय आणि गुण्यागोविंदाने नादताना दिसतायत.तळकोकणात प्रत्येकाच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होते.मात्र याला कोईळ गाव अपवाद आहे. या गावामध्ये असलेल्या गणपतीच्या मंदिरामध्ये सर्व गावकरी एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात.याच मंदिरातील काळ्या दगडाची गणेशमूर्ती गणेश चतुर्थीच्या काळात सजविली जाते. या गावांमध्ये ६०० वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे, असे स्थानिक गावकरी सांगतायत.

    या गणेश उत्सवासाठी कामानिमित्त बाहेरगावी असलेले चाकरमानी आवर्जून येत असतात. या गावांमध्ये ८०ते ९० घरे असून ३०० ते ३५० लोकवस्ती आहे.सर्वजण एकत्र येतात. गणेश उत्सव भक्तिभावाने एकमताने साजरा केला जातो.सर्व प्रथम त्यामध्ये संपूर्ण गावांमध्ये फिरून शिधा गोळा केला जातो. त्याच शिधामधून गणेश चतुर्थीच्या काळामध्ये सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. गणेश चतुर्थीच्या काळामध्ये घरामध्ये कोणतीही मूर्ती किंवा प्रतिमा लावली जात नाही.तसेच सत्यनारायणाची पूजा वगैरे असेल तेसुद्धा याच मंदिरामध्ये केली जाते.कुणाच्याही घरी केली जात नाही.त्यामुळे गणेशोत्सवाचे ११ दिवस भक्तिमय वातावरणात साजरे केले जातात.

    विशेष म्हणजे लग्न पत्रिकेमध्ये गणपतीचे चित्र छापले जात नाही. त्यामुळे काही लोकांचा गैरसमज होतो. की ही लोक गणपतीला मानत नाही ‘तस नाही तर’ आमचे एक श्रद्धास्थान असे आहे. की, गणरायाचा विघ्नहर्ता म्हणून एक लौकिक आहे. त्याची कुठेही विटंबना होता नये. त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे, असे मत तिथल्या स्थानिक ग्रामस्थांचे आहे.

    गेले अनेक वर्षापासून चालत आलेली ही परंपरा आहे. एक गाव एक गणपती त्याच प्रमाणे युवापिढी ही त्याच परंपरेप्रमाणे गावामध्ये चालवत आहे. ज्या पद्धतीने मागच्या पिढीने परंपरेनुसार सांभाळत आले त्याच पद्धतीने आम्ही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून ही परंपरा कायम जोपासणार आहोत. घरगुती गणपती पेक्षा आम्हाला एकत्र येऊन या ठिकाणी सार्वजनिक गणपती उत्सव आम्ही साजरा करतो आम्हाला खूप आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया स्थानिक ग्रामस्थ देतायत.

    ऐतिहासिक वारसा असलेल्या या गावाला शासनाच्या योजनेपासून दूर रहावे लागत आहे.या गावांमध्ये जायला फारसा नीट रस्ता देखील नाही. मे महिन्यात या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमी भेडसावतो.त्यामुळे या गावाकडे लोक प्रतिनिधी लक्ष द्यावे, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.

    गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकणात बाप्पाचं आगमन

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed