• Sat. Sep 21st, 2024
पुण्यात भाजपची कार्यकारिणी जाहीर; नातलगांची वर्णी लागली, चर्चांना उधाण

पुणे: भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहरातील सर्वच नेत्यांची मनधरणी करून, त्यांच्या मुलांना, नातेवाईकांना कार्यकारिणीत स्थान देऊन माजी नगरसेवकांचा मेळ घालत ५० जणांची जम्बो कार्यकारिणी सोमवारी सकाळी जाहीर केली. आमदार माधुरी मिसाळ यांचे चिरंजीव करण मिसाळ, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांचे पुतणे दुष्यंत यांची कार्यकारिणीवर नियुक्ती करताना भाजपच्या महिला आघाडीला प्रभारी म्हणून माजी नगरसेविका वर्षा तापकीर यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाकरेंचे वाकचौरेंना आशीर्वाद, घोलप दुखावले, पवारांची भेट घेऊन इशारा दिला, आता म्हणतात…
आमदार मिसाळ यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन आपल्या मुलाला राजकारणात सक्रिय करण्यासाठी संघटनात्मक पातळीवर शहराची जबाबदारी देण्यात यश मिळवले आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यकारिणीत माजी नगरसेवक, नगरसेविकांना आवर्जून स्थान दिल्याचे चित्र उमटले आहे. त्यात माजी नगरसेविका वर्षा तापकीर, मंजूषा नागपुरे, रूपाली धाडवे, माजी नगरसेवक राजेंद्र शिळीमकर, राहुल भंडारे, अजय खेडेकर, आदित्य माळवे, अनिल टिंगरे, हरिदास चरवड यांचा समावेश आहे.

अशी आहे कार्यकारिणी

शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहर उपाध्यक्षपदी १८, सरचिटणीसपदी आठ, तर चिटणीसपदी १८ जणांची नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती करताना आठही विधानसभा मतदारसंघांना प्राधान्य देण्यात आले आहे. शहरातील ज्येष्ठ नेत्यांची मर्जी राखताना घाटे यांची दमछाक झाल्याचे चित्र यात उमटले आहे. स्वरदा बापट यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी हर्षदा फरांदे, तर भाजप युवा मोर्चा अध्यक्षपदी करण मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रतीक देसर्डा यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या शहर प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. नामदेव माळवदे (अध्यक्ष, ओबीसी मोर्चा), भीमराव साठे (अध्यक्ष, अनुसूचित जाती मोर्चा), इम्तियाज मोमीन (अध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी), तर व्यापारी आघाडी अध्यक्षपदी उमेश शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

गणरायाच्या आगमनाचा जल्लोष; सिद्धार्थ जाधव ढोल-ताशा पथकात सहभागी

सरचिटणीस : वर्षा तापकीर, राजेंद्र शिळीमकर, रवी साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, राहुल भंडारे, महेश पुंडे.

चिटणीस : कुलदीप सावळेकर, किरण कांबळे, किरण बारटक्के, अजय खेडेकर, आदित्य माळवे, राहुल कोकाटे, विवेक यादव, उदय लेले, विशाल पवार, लहू बालवडकर, उमेश गायकवाड, सुनील खांदवे, प्रवीण जाधव, हनुमंत घुले, रेश्मा सय्यद, अनिल टिंगरे, आनंद रिठे, दुष्यंत मोहोळ.

उपाध्यक्ष : मंजूषा नागपुरे, श्याम देशपांडे, प्रमोद कोंढरे, अरुण राजवाडे, तुषार पाटील, विश्वास ननावरे, प्रशांत हरसुले, जीवन जाधव, सुनील पांडे, स्वरदा बापट, योगेश बाचल, भूषण तुपे, संतोष खांदवे, महेंद्र गलांडे, रूपाली धाडवे, हरिदास चरवड, गणेश कळमकर, प्रतीक देसर्डा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed