• Sat. Sep 21st, 2024
सिडकोला ६० कोटींचा गंडा, ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

नवी मुंबई : ठाकरे गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष शिरीष घरत यांनी सिडकोला ६० कोटींचा गंडा घातल्याप्रकरणी शिरीष घरत यांच्यावर बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरीष घरत यांनी भूखंडावर हक्क सांगत सिडकोकडून भूखंड घेतला आहे. त्यात घरत यांनी नवी मुंबईच्या मेट्रोच्या कामासाठी खोटा भूखंड देऊन मोठी फसवणूक केली आहे. त्यामुळे बेलापूर पोलीस स्टेशनमध्ये शिरीष घरत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काकांचे कार्यालय, शरद पवार डाव टाकणार
शिरीष घरत हे ठाकरे गटाचे रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत. शिरीष घरत यांनी त्यांच्या मालकीचा मौजे बेलपाडा (खारघर ) ता. पनवेल, जि. रायगड येथील जुना सर्वे नं. ४७४ गट नं. १७ या भुखंडाची विक्री मे. के. एस. श्रीया इंन्फ्राबिल्ड प्रा. लि. आणि विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांना साठेखत व कुलमुखत्यारपत्राद्वारे रक्कम ७,००,००,००० रूपयांना विक्रि करून त्या मोबदल्यात १,९८,००,००० रूपये स्विकारले आणि सदर भुखंडाचे संबंधितास अभिहस्तांतरीत करून त्यामध्ये नमुद दोन कंपन्यांचा त्रयस्थ पक्षकाराचा अधिकार प्रस्थापित केला. तसेच नमुद भूखंडाबाबत शिरीष घरत यांचे नमुद भुखंडाबाबत अधिकार संपुष्ठात आले असतानाही तो स्वत:च्या अधिकारात असल्याचे खरेदीदारला नमुद दोन कंपन्या व सिडको महामंडळास भासवून अप्रामाणिकपणे सदर भुखंडाची ताबा पावती सिडको महामंडळला दिली. त्या मोबदल्यात स्वतःच्या फायद्याकरीता समान क्षेत्राचा भुखंड क्र. १९/ए, सेक्टर ०७, खारघर नोड, क्षेत्र २५०० चौ. मि. या भुखंडाचा ताबा घेवुन मे. के. एस. श्रीया इंन्फाबिल्ड प्रा. लि. आणि विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांची व सिडको महामंडळाची ६० कोटी रूपयांची फसवणुक केली. याच कारणास्तव शिरीष घरत यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच घरत यांनी सिडकोसह अजून दोन कंपन्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून घरत यांच्यावर बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अद्याप शिरीष घरत यांना अटक करण्यात आलेलं नाही.

शिंदे-फडणवीस बोलून झाले मोकळे, मराठवाड्यातील जनतेच्या हाती फक्त भोपळे: नाना पटोले
नवी मुंबईमधील बेलापूर ते पेंधर या मेट्रोचे काम पूर्ण झालेलं आहे. मात्र अद्याप मेट्रोचे उदघाटन झालेलं नसतानाच शिरीष घरत यांनी फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. शिरीष घरत यांनी ६० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या ह्या फसवणुकीमध्ये अजून कोणी सहभागी आहे का? हे तपासण्याचं काम पोलीस करत आहेत.

शेतातली ताजी भेंडी काढली, ओंजळ भरून दिली; आदित्य ठाकरेंना शेतकरी महिलेने दिला वानोळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed