• Fri. Mar 6th, 2026

    आमदार भीमराव केराम यांच्याहस्ते बॅडमिंटन इनडोर हॉलचे उदघाट्न..

    ByMH LIVE NEWS

    Sep 16, 2023

    नांदेड – प्रतिनिधी
    मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आजादी का अमृत मोहोत्सव यानिमित्त किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांच्या स्थानिक निधीमधून 15 लक्ष 69 हजार रुपये खर्च करून क्रीडा संकुल किनवट येथील इनडोर बॅडमिंटन हॉल दोन नवीन सुसज्ज व अत्याधुनिक सिंथेटीक कोर्ट नुकतेच बनविण्यात आले.त्यांचे उद्घाटन काल दि.15 सप्टेंबर 2023 रोजी आमदार भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तीकेएन, तहसीलदार व प्रशासाक तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.
    यावेळी तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार ,सुप्रसिद्ध उद्योजक संजय नेम्मानिवार,अनिल तिरमनवार, माजी नगरसेवक अभय महाजन, संदीप केंद्रे, मारोती भोसले ,संदीप येशीमोड कराटे प्रशिक्षक कर्मचारी राज मेल्डे अतिश तामगाडगे मारोती येशीमोड. आदी मान्यवर उपस्थित होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed