• Mon. Nov 25th, 2024
    आधी भाजप आमदारांचे मुख्यमंत्र्यांवर आरोप, पुन्हा नेत्यांमध्येही जुंपली, आ. गायकवाडांना शिंदे गटाचं सणसणीत प्रत्युत्तर

    ठाणे: कल्याण लोकसभेत सत्ताधारी शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात पटत नसल्याचे वारंवार समोर येतं आहे. काही दिवसांपूर्वी भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड समाज माध्यमांसमोर भिडले होते. तर वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही पक्षातील कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. एखादा दक्षिणेतील चित्रपट आपण पाहतो आहे, असेच काहीसे चित्र दिसून आले होते. यातच आता कल्याण पूर्वेतील भुयारी गटाच्या चेंबर दुरुस्तीच्या कामावरुन भाजप आणी शिवसेना शिंदे गटात वाद पेटला आहे.
    पूर्ण न होणारी आश्वासने दिली नाहीत ना…? राज ठाकरे यांनाही ‘ती’ भीती, लांबलचक पोस्ट लिहिली
    शिंदे गटापुढे भाजपचे काही चालत नाही, त्यामुळे शिंदे गट म्हणेल तेच होणार आहे. महापौर यांनी नंतर बसवायच्या वार्ता कराव्यात, असं विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी केलं होत. दरम्यान या विधानाला कल्याण पूर्वेचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनीही पाठिंबा दर्शवला असून पाटील यांच्या मताशी मी सहमत आहे, असे सांगत शिंदे पिता पुत्रांकडून राज्यात भाजप शिंदे पिता-पुत्र आणि गटाने भाजप कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्याचं काम सुरु केले आहे, असा थेट आरोपचं गायकवाड यांनी केला आहे.

    यालाच आता शिवसेना शिंदे गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. युवासेने सचिव आणि केडीएमसी माजी सभापती दिपेश म्हात्रे यांनी भाजप आमदाराला टोला हाणत सांगितले की, हीच लोक काही दिवसापूर्वी खासदाराच्या गाडीत बसून भूमिपूजन करत होती. कल्याण पूर्वेत खासदार यांना घेऊन फिरत होते. तेव्हा यांना गळचेपी दिसली नाही का? असे आमदार गणपत गायकवाड यांचे नाव न घेता सांगितले.

    मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या बाजूला बसून सांगितली पत्रकार परिषदेपूर्वीच्या व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट

    दरम्यान आता कल्याण पूर्वेत शिंदे गटाचे शहर प्रमुख गायकवाड यांच्या कार्यालयासमोरील चेंबरच्या दुरुस्ती कामावरुन शिवसेना शिंदे गटाने भाजपमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली आहे. काही दिवसापूर्वी भाजप आमदारांनी या कामासाठी पत्र व्यवहार केला होता. त्यामुळे हे काम मार्गी लागले अशी पोस्ट आमदारांच्या सोशल मिडिया अकाऊंटला टाकण्यात आली होती. त्यांची पोस्ट पाहून शिंदे गटाचे शहर प्रमुख गायकवाड यांनी यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी खरे तर हे कामासाठी मी प्रयत्न केले. माझ्यामुळे हे काम मार्गी लागले. आमदारांकडून सोशल मीडियावर काम केल्याचे सांगून श्रेय घेतले जात आहे. ही लाजिरवाणी बाब आहे. पंधरा वर्षात केवळ पोपटपंची केली आहे. केवळ भूलथापा दिल्या आहे. हे कर्तृत्व शून्य आमदार आहेत, अशी टीका केली आहे.

    या टिकेला भाजप पदाधिकारी तांबे यांनी प्रतिउत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले, शिंदे गटाचे शहर प्रमुख गायकवाड यांच्याकडून राजकीय स्टंटबाजी केली जात आहे. आमदारांचे विरोधात बोलून त्यांना वाटते ते मोठे होतील. आमदारांनी केलेली विकास कामे ही जनतेला माहिती आहेत. त्यांच्या विकास कामांवर ही मंडळी पाट्या लावून ते काम त्यांनी केल्याचे भासवित आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अशा चमच्यांना आवरावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed