नागपूर : राज्यात सध्या सर्वत्र पाऊस सुरू असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. हवामान खात्याकडून अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. अशात पुढील दोन दिवस विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर सर्वच ठिकाणी दमदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ तर काहींना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
प्रादेशिक हवामान खात्यानुसार, शुक्रवारी व शनिवारी विदर्भात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. शुक्रवारी भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज तर अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच शनिवारी चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, नागपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज तर इतर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या काळात शहर तसेच प्रामुख्याने ग्रामीण भागातील जनतेने पुराच्या व वीज कोसळण्याच्या दृष्टिकोनातून काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट…
या जिल्ह्यांना येलो अलर्ट…
मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या २२ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, लातूर, नांदेड, परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलक्याचे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.