• Sat. Sep 21st, 2024
बैलांशी अनोखे ऋणानुबंध; बैल पोळ्याला ७५ वर्षांची परंपरा जपली, ‘या’ शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा

पुणे: राज्यभरात अनेक ठिकाणी बैल पोळा हा सण उत्साहात साजरा केला जातो. श्रावणी बैल पोळा आणि भाद्रपदी बैल पोळा अशा दोन प्रकारे हा सण साजरा केला जातो. त्यात उद्या श्रावणी बैल पोळा आहे. वर्षभर शेतकरी आपल्या बैलाला पोटच्या मुलाप्रमाणे जीव लावत असतो. बैल पोळा सणाच्या दिवशी बैलांना सजावट केली जाते. त्यांची मिरवणूक काढली जाते. मात्र आंबेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्यांनी बैल पोळ्याची ही परंपरा ७५ वर्षापासून जपली आहे.
Bail Pola: नैसर्गिक संकटांमुळे पिकांचं नुकसान, हातात दमडी उरली नाही; शेतकऱ्यांना बैलपोळ्याच्या खर्चाची चिंता
महाळूंगे पडवळ या गावातील असणारे शेतकरी दत्तात्रय बबन आवटे यांनी ही परंपरा जपली आहे. आवटे यांचा परंपरागत व्यवसाय शेती आहे. त्यामुळे बैलांशी ऋणानुबंध जोडलेले. त्यांच्याकडे एकूण आठ बैल आहेत. त्यांची बैल पोळ्याला बैल आणण्याची ७५ वर्षांची परंपरा जपली आहे. आतापर्यंत त्यात एकदाही खंड पडलेला नाही. याशिवाय स्वतंत्र गाडा मालक असलेला पहिला गाडा मालक आहे. गाडा बैल ४० वर्ष आणि शेतीची बैल १० वर्ष अशी ५० वर्षांची परंपरा आवटे यांनी जपली आहे. अनेकदा बैल गाड्यात पळवण्यासाठी दुसऱ्यांचे बैल आणले जातात. मात्र आवटे यांच्याकडे स्वतःचे बैल बैल गाडा शर्यतीमध्ये पळवले जातात. आवटे यांनी ४० हजारापासून दोन लाखापर्यंत बैलांची खरेदी केलेली आहे. याशिवाय बैलांसोबत पळणारी घोडी देखील स्वतःचीच आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी केली आपल्या सर्जा राजाची खांदेमळणी

आवटे यांचे कुटुंब शेतकरी असल्याने त्यांचे कुटुंब देखील त्यांना यामध्ये तेवढीच साथ देते. या कुटुंबाकडून बैलांची मुलांप्रमाणे सेवा केली जाते. दत्तात्रय आवटे यांचे बैलांवर असलेले प्रेम हे त्या परिसरात सर्वांनाच माहीत आहे. महाळूंगे पडवळ हे गाव हुतात्मा बाबू गेणू यांचे हे गाव आहे. त्यामुळे या गावाला ऐतिहासिक परंपरा देखील तेवढीच आहे. मात्र आवटे कुटुंबीयांनी जपलेली ही परंपरा आणि बैलावर असलेले प्रेम त्यांची ७५ वर्षांपासून होणारी सेवा ही खरचं कौतुकास्पद अशीच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed