• Mon. Nov 25th, 2024
    बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख अपहरण प्रकरणी मोठी अपडेट; गूढ उकलले, राजस्थान कनेक्शन समोर

    नाशिक : नाशिक शहरातील बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांच्या अपहरण प्रकरणी नाशिक पोलिसांनी राजस्थानमधून एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. नाशिकच्या इंदिरानगर परिसरात राहणारे बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांच्या अपहरणाची तक्रार २ सप्टेंबर रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती.

    पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखा युनिट क्र. १,२ तसंच इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या एका पथकाची आरोपींचा शोध घेण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार राजस्थान येथील संशयित आरोपी महेंद्र बिश्नोई याने त्याच्या साथीदारांच्या मदतीनं पारख यांचं अपहरण करून २ कोटी रुपयांची खंडणी उकळल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

    पाकिस्तानच्या फायनलचा फैसला ५० नाही तर २० षटकांतच होणार, जाणून घ्या सुपर समीकरण
    पोलिसांनी संशयित महेंद्र उर्फ नारायणराम बाबुराम बिश्नोई, पिंटू उर्फ देवीसिंग बद्रिसिंग राजपूत, रामचंद्र ओमप्रकाश बिश्नोई यांना ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे, या अपहरण प्रकरणातील मुख्य सूत्रधार इगतपुरी तालुक्यातील लहांगेवाडी येथील अनिल भोरू खराटे असल्याचं समोर आलंय. खराटे याने गुन्ह्याचा कट रचला होता. हेमंत पारख यांची सर्व माहिती आरोपींना दिली होती, असंही तपासात समोर आलंय. पोलिसांनी संशयितांकडून मागितलेल्या २ कोटी रुपयांच्या खंडणीपैकी एक कोटी ३३ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

    व्यावसायिक हेमंत पारख यांचं शनिवारी २ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या घराबाहेरून अपहरण करण्यात आलं होतं. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात अपहरणकर्त्यांनी त्यांना नंबरप्लेट नसलेल्या गाडीत बसवून त्यांचं अपहरण केलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे पोलीस दलासह घटनास्थळी दाखल झाले होते. यानंतर रविवार ३ सप्टेंबर रोजी रविवारी पहाटे हेमंत पारख सुखरूप घरी परत आले होते.
    Manoj Jarange: ‘इतकी फेकाफेकी पाहिली नाही.. पण मुख्यमंत्री येतील’, ती बातमी कळताच मनोज जरांगे असं का म्हणाले?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed