• Mon. Nov 25th, 2024

    आतापर्यंत कधीही न लढलेल्या लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरेंचे आदेश; महायुतीला बसणार फटका

    आतापर्यंत कधीही न लढलेल्या लोकसभा मतदारसंघासाठी राज ठाकरेंचे आदेश; महायुतीला बसणार फटका

    पुणे : राज्यातील सर्व पक्षांनी आपापल्या परीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वच पक्ष कामाला लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आतापर्यंत कधीही न लढलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघासाठी मनसे आता तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, ठाकरे गट यांच्यानंतर आता मनसे देखील यासाठी मतदारसंघासाठी आखणी करू लागली आहे. तशा सूचना देखील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना देण्यात आल्या आहेत.

    मावळ लोकसभा ही सर्वच पक्षांना हवा असणारा मतदार संघ आहे. सध्या या लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे करत आहेत. या अगोदर दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी २०१४ला निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. मनसेच्या पाठिंब्यावर त्यांनी ही निवडणूक लढवली होती. त्यानंतर २०१९ला या मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना देखील उमेदवारी देण्यात आली होती. यासाठी राष्ट्रवादीने चांगलीच कंबर कसली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.

    या संदर्भात मनसेची बैठका घेण्यास सुरुवात झाली आहे. मनसे आतापर्यंत मावळमधून कधीही लढलेले नाहीत. मात्र यंदाच्या निवडणुकीत मावळसाठी मनसे उमेदवार देणार असल्याचा चर्चा आता सुरू झाल्या असून तशा बैठकांना देखील सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत उमेदवार अद्याप जरी फायनल झाला नसला तरी मनसेकडून मात्र जय्यत तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

    मावळच्या नियोजनाची पहिली बैठक नुकतीच वरसवली येथे पार पडली. या मतदारसंघाचे संघटक रणजित शिरोळे, समन्वय संघटक अमेय खोपकर आणि चिखले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पिंपरी-चिंचवड, मावळ, पनवेल, उरण आणि कर्जत अशा सहाही विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

    आपल्याला मावळ लोकसभा जिंकायचीच आहे. त्यामुळे सर्वांनी जोमाने कामाला लागा. कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा. नागरिकांच्या घरी पोहोचा, लोकांच्या अडीअडचणी सोडवा, असे आदेश यावेळी देण्यात आले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेसाठी मनसेने डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. जर मनसेने उमेदवार दिला तर याचा महायुतीला कितपत फटका बसेल हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

    इथे सगळे गेंड्याच्या कातडीचे; महिलेची रुग्णालयाच्या गेटवर प्रसूती, मनसे आमदार राजू पाटील आक्रमक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed