• Sat. Sep 21st, 2024
Mumbai News: आनंदाची बातमी; मुंबई दर्शनसाठी नव्या बसगाड्या, तीन AC गाड्या, कधी सुरु होणार?

मुंबई : पर्यटकांसाठी आकर्षण असलेली आणि मुंबई दर्शन घडवणारी बेस्टच्या ताफ्यातील शेवटची ओपन डेक बस आयुर्मान संपल्याने येत्या ऑक्टोबरमध्ये सेवेतून हद्दपार होणार आहे. मात्र प्रवाशांचा मिळणाऱ्या चांगल्या प्रतिसादामुळे नवीन डबल डेकर ओपन डेक बसगाड्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली आहे. ही खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुंबई बस सेवा खंडीत होऊ नये, यासाठी एसी डबल डेकर इलेक्ट्रिक बस मुंबई दर्शनाकरीता चालवण्यात येणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.

बेस्ट उपक्रमाने एमटीडीसीच्या मदतीने २६ जानेवारी, १९९७ रोजी ओपन डेक बस सुरू केली. या बसमध्ये अप्पर डेक आणि लोअर डेक असे प्रकार आहेत. सध्या या बसमधून पर्यटकांना दक्षिण मुंबईतील पर्यटनस्थळांचा आनंद लुटता येतो. बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात तीन ओपन डेक बस असून, यातील शेवटची बस आयुर्मान संपल्याने ५ ऑक्टोबरला मोडीत काढली जाणार आहे. एका बसचे आयुर्मान हे साधारण पंधरा वर्षे असते. शेवटची बस सेवेतून हद्दपार होणार असल्याने आणि भाडेतत्त्वावर ५० एसी डबल डेकर पर्यटन बसचीही निविदा रद्द केल्याने ऑक्टोबरनंतर मुंबई दर्शन सेवा बंदच होत असल्याचे वृत्त ‘महाराष्ट्र टाइम्स’ ४ सप्टेंबरला प्रसिद्ध झाले होते.

Mumbai News: चर्नी रोड स्थानकाचा कायापालट होणार, स्टेशन प्रशस्त होणार; काय काय सुविधा मिळणार?
यासंदर्भात बेस्ट उपक्रमाने माहिती देताना ओपन डेक बसला पर्यटकांचा मिळणारा प्रतिसाद आणि वेगळा अनुभव पाहता नवीन डबल डेकर ‘ओपन डेक’ बसगाड्या खरेदी केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. त्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती उपक्रमाने दिली.

तीन एसी गाड्या

खरेदी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ताफ्यातील डबल डेकर एसी बसगाड्या मुंबई दर्शनसाठी चालवण्यात येणार आहेत. सोमवार ते शुक्रवार या दिवशी तीन एसी डबल डेकर बस आणि शनिवार, रविवारी या दिवशी पाच एसी डबल डेकर बस पर्यटकांसाठी चालवण्यात येणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.

देशातील सामाजिक भेदभाव संपत नाही तोपर्यंत संघाचा आरक्षणाला पाठिंबा: मोहन भागवत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed