• Mon. Nov 25th, 2024
    मुंबईतून चिमुकलीचे अपहरण; आरोपीची कोलकत्त्याकडे कूच, मात्र एक चूक झाली अन् डाव फसला, नेमकं काय घडलं?

    बुलढाणा: मुंबई येथून ६ वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. सीसीटीव्हीच्या साहाय्याने पोलिसांनी आरोपीला शालिमार एक्स्प्रेसमधून शेगाव रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमधून अटक केली. राठीन शंकर घोष (३३) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा कोलकत्ता पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे.
    तरुणीचा आयुष्य संपवण्याचा निर्णय; मैत्रिणीनं समजवलं, तिच्यासोबतच घरातून पलायन, नंतर जे घडलं त्यानं सगळेच हैराण
    मिळालेल्या माहितीनुसार, नागपाडा मुंबई येथून एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून युवक शालिमार एक्सप्रेसने कोलकत्ताकडे निघाला असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून शेगाव रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानंतर आज बुधवारी सकाळी शेगाव रेल्वे स्थानकावर आरपीएफ, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत शालिमार एक्सप्रेस शेगाव रेल्वे स्थानकावर अधिक काळ थांबवून गाडीची तपासणी केली. त्यात नागपाडा येथून अपहरण झालेली चिमुकली आणि अपहरण करणारा आरोपी रेल्वेच्या जनरल कोचमध्ये मिळून आला.

    नववीत शिकणाऱ्या हिंगोलीच्या कन्येची भरारी; ‘नासा’मध्ये प्रशिक्षणाची संधी

    शेगाव रेल्वे स्टेशनवर गाडी थांबल्यानंतर आपल्याला पोलिसांनी पाहू नये यासाठी स्टेशन येताच आरोपी हा शौचालयात जाऊन बसला होता. यानंतर आरपीएफ रंजन तेलंग आणि विनोद इंगळे यांनी कसून तपासणी केली असता आरोपी मिळून आला. त्याला पोलिसी खाक्या दाखवतात त्याने आपल्या सोबतची चिमुकली जनरल कोचमध्ये वरच्या बाजूला बसून ठेवल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी या चिमुकलीला तेथून रेस्क्यू केले. यानंतर ही माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली. आरोपीची कसून चौकशी सुरु असून मुलं चोरीच्या रॅकेटची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed