• Mon. Nov 25th, 2024

    संकटमोचक गिरीश महाजन अंतरवाली सराटीत, मनोज जरांगे यांची मनधरणी सुरु, काय घडलं?

    संकटमोचक गिरीश महाजन अंतरवाली सराटीत, मनोज जरांगे यांची मनधरणी सुरु, काय घडलं?

    जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली गावात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, भाजप आमदार नितेश राणे, आमदार मंगेश चव्हाण दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांच्याकडून मनोज जरांगे यांना उपोषण मागं घेण्याची विनंती करण्यात आली. मात्र, मनोज जरांगे उपोषणावर ठाम आहेत.

    गिरीश महाजन यांनी जरांगे यांना उपोषण मागं घेण्यासाठी मनधरणी केली. यावेळी गोळीबार झाला तो प्रकार चुकीचा होता, असं त्यांनी म्हटलं. आज आमच्या गावातील ६० जणांना उचललं जात आहे. पोरांना जेलमध्ये नेलं जात आहे. केसेसचा विषय होत नाही, बडतर्फ केलं जात नाही. आमच्या आई वडिलांवर हल्ला करण्यात आला, असं जरांगे पाटील म्हणाले.

    मराठवाड्यातील मराठ्यांना जीआर काढा आणि आरक्षण देऊन टाका, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. मी शब्द दिलेला आहे, जोपर्यंत जीआर दिसणार नाही तोपर्यंत माघार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

    गिरीश महाजन यांनी हे आरक्षण एक दिवस तरी कोर्टात टिकेल का असा सवाल जरांगे यांना केला. त्यानंतर गिरीश महाजन यांनी आपल्या सरकारनं आरक्षण दिलं होतं. मात्र, सरकार गेल्यानंतर आरक्षण गेल्याचं महाजन म्हणाले. यावर जरांगे यांनी आम्ही लोकं पाठवतो त्यांच्याशी चर्चा करा असं, जरांगे म्हणाले. आम्हाला आरक्षण कसं गेलं त्यात पडायचं नाही, मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण द्या, अशी मागणी जरांगे यांनी केली.
    IND v PAK सामना रद्द झाल्यावर भारत आता सुपर-४ मध्ये कसा पोहोचणार, जाणून घ्या समीकरण…
    गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे यांना एक महिना वेळ देण्याची मागणी केली. मराठवाड्याला आरक्षण दिल्यास ते कोर्टातील पहिल्या सुनावणीला देखील टीकणार नाही, असं महाजन म्हणाले. यावर मनोज जरांगे यांनी १९९० ला ओबीसींची लोकसंख्या २८ टक्के होतं तेव्हा १४ टक्के आरक्षण दिलं होतं. १९९४ ला ३० टक्क्यांवर गेल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं.
    Pune News: पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा: PMP बसबाबत महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?
    मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी आरक्षण द्या आणि विषय संपवा, जीआर काढा, असं मनोज जरांगे म्हणाले. २००४ चा मराठा आणि कुणबी एक असल्याचा जीआर काढा, अशी मागणी देखील जरांगे यांनी केली. बातमी लिहिस्तोवर गिरीश महाजन आणि मनोज जरांगे यांच्यातील चर्चा कुठंपर्यंत पोहोचली याबाबत नवी अपडेट आलेली नव्हती.
    मराठा आंदोलन इफेक्ट: SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; जालन्यात खमक्या पोलीस अधिकाऱ्याची एंट्री

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *