• Mon. Nov 25th, 2024

    पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा: PMP बसबाबत महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?

    पुण्यातील प्रवाशांना मोठा दिलासा: PMP बसबाबत महत्त्वाचा निर्णय, काय फायदा होणार?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) पुणे, पिंपरी-चिंचवडबरोबरच आता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत पास सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पीएमपीतून दिवभरात कुठेही १२० रुपयांत फिरता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

    ‘पीएमपी’कडून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील नागरिकांना प्रवासी सेवा दिली जाते; पण आतापर्यंत फक्त पुणे व पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना दैनंदिन व मासिक पासची सोय होती. ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत नागरिकांना तिकीट काढूनच प्रवास करावा लागत होता. ‘पीएमआरडीए’च्या आयुक्तांना पीएमपीच्या संचालक मंडळावर घेण्यात आल्यानंतर पीएमपीला त्यांनी निधीदेखील दिला आहे. त्यामुळे पीएमपीने ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत सेवा नियमित सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

    आता नुकत्याच झालेल्या पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ‘पीएमआरडीए’च्या हद्दीत प्रवाशांना पास सेवा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पीएमपी प्रशासनाने पासचे दर निश्चित केले आहेत. नागरिक जवळच्या पास केंद्रावर जाऊन आधारकार्ड व इतर ओळखपत्र दाखवून पास घेऊ शकतात. ही पाससेवा आज, सोमवारपासून (दि. ४) सुरू केली जाणार आहे, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.

    मराठा आंदोलन इफेक्ट: SP तुषार दोशी सक्तीच्या रजेवर; जालन्यात खमक्या पोलीस अधिकाऱ्याची एंट्री

    शहरानुसार पासचे दर (रुपयांत)

    शहराचे नाव- दैनंदिन पास दर – मासिक पास दर

    पुणे – ४० – ९००
    पुणे व पिंपरी-चिंचवड – ५० – १,२००
    पीएमपीची पूर्ण हद्द – १२० – २,७००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed