नागपूर : रेल्वेखाली उडी घेऊन २१वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. ही घटना बेलतरोडी पोलिस स्टेशन हद्दीतील मनीषनगर परिसरात उघडकीस आली. शाश्वत ऊर्फ प्रशिश चंद्रकांत सतदेवे (रा. बिराज हाइट्स, प्रभुनगर) असे मृतकाचे नाव आहे.
काय घडलं?
काय घडलं?
शाश्वत ऊर्फ प्रशिश हा व्यवस्थापनाच्या अभ्यासक्रमाला शिकायचा. त्याचे वडील चंद्रकात हे औषध कंपनीत तर आई हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. गुरुवारी जेवण केल्यानंतर ‘फिरून येतो’, असे सांगून शाश्वत घरून निघाला. मात्र, परतला नाही. नातेवाइकांनी शोध घेतला असता आढळला नाही. वडिलाने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी शाश्वत बेपत्ता असल्याची नोंद घेतली. शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मनीषनगर परिसरातील रेल्वेरुळाजवळ शाश्वत जखमी अवस्थेत आढळला. पोलिसांनी त्याला मेडिकलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी यामागे ‘नाजूक’ कारण असल्याची चर्चा पोलिसांत आहे.