• Sat. Sep 21st, 2024
वडिलांच्या मदतीसाठी धावली गौतमी; उपचारासाठी उचललं पाऊल, म्हणाली- माणुसकीच्या नात्याने…

धुळे: लावणी नृत्याच्या माध्यमातून संपूर्ण राज्याला परिचीत झालेल्या आणि तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हिचे वडील धुळ्यात बेवारस, खंगलेल्या अवस्थेत आढळून आले होते. सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही बातमी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने प्रसिद्ध करताच गौतमी पाटीलने बातमीची दखल घेत आपल्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुणे येथे बोलावून घेतले आहे.
नृत्यांगणा गौतमी पाटीलचे वडील धुळ्यात बेवारस सापडले; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव असून सध्या त्यांच्यावर धुळे शहरातील सिद्धेश्वर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रसारमाध्यमांवर ही बातमी प्रसिद्ध होताच गौतमी पाटीलने याची दखल घेत आपल्या मावशीला या गोष्टीची कल्पना दिली. तसेच मावशीला सांगितले की, वडिलांची तब्येत कशी आहे याची तू विचारणा कर. तसेच त्यांना पुढील उपचारासाठी माझ्याकडे पुण्याला घेऊन ये. असे सांगितल्यानंतर तिच्या मावशीने लागलीच धुळे गाठले. या ठिकाणी त्यांच्या मावशी आणि धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांच्या मदतीने गौतमीच्या वडिलांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन गेल्या.

थोडा उशीर झाला असता तर दगावले असते; गौतमी पाटीलच्या वडिलांची बिकट अवस्था

यासंदर्भात गौतमी पाटीलने आपली प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, कालच मी माझे वडील धुळ्यात एका रुग्णालयात ऍडमिट असल्याची बातमी पाहिली. त्यानंतर मी माझ्या मावशीला या संदर्भात सांगितले की वडिलांची तब्येत आता कशी आहे. त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन ये. वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेन. पुढील उपचार त्यांचे मी पुण्यालाच करीन. तसेच धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांनी देखील गौतमी पाटीलच्या वडिलांची त्यांच्या वतीने जेवढी काळजी घेता येईल तेव्हढी काळजी घेऊन एक मदतीचा हात दिल्याने गौतमी पाटीलने माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांचे देखील आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed