म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेने (एमआरव्हीसी) जुईनगर येथे चार स्टेबलिंग मार्गिकांची उभारणी पूर्ण केली आहे. यामुळे उपनगरी रेल्वेवरील विशेषत: हार्बर मार्गावरील लोकल पार्किंगचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. हार्बर मार्गावरील लोकल उभ्या करण्यासाठी आता नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.
स्टेबलिंग मार्गिका नसल्याने जुईनगर, सानपाडा, वाशी या रेल्वे स्थानकांवरील फलाटात लोकल उभ्या कराव्या लागत होत्या. लोकल प्रवासी वाहतुकीत दाखल करण्यापूर्वी तपासणी करण्यासाठी फलाटातून बाहेर आणणे त्यानंतर तपासणी करणे, अशी वेळखाऊ प्रक्रिया होत होती. स्टेबलिंग मार्गिका उपलब्ध झाल्याने थेट मार्गिकावर तपासणी होऊन त्यानंतर थेट प्रवासी वाहतुकीसाठी लोकल दाखल करता येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

जुईनगरमध्ये चार स्टेबलिंग मार्गिकांच्या उभारणीसाठी सप्टेंबर, २०२२मध्ये काम सुरू करण्यात आले होते. यावर्षी २७ ऑगस्टमध्ये काम पूर्ण करण्यात आले. यासाठी एकूण ३९ कोटींचा खर्च झाला आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. या चार मार्गिकांमुळे किमान सहा लोकल उभ्या करण्यात येणार आहे.
परिवहन क्षमतेत वाढ
स्टेबलिंग मार्गिकांमध्ये सिग्नलच्या अद्यावतीकरणाचेही काम रेल्वे प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहे. सध्याची सिग्नल संख्या ३४ वरून ६९ पर्यंत वाढवण्यात आल्याने लोकलच्या परिवहनाच्या क्षमतेत वाढ होणार आहे, असा दावा रेल्वे अधिकाऱ्यांनी केला आहे.