• Sat. Sep 21st, 2024
म्हाडाचं साडेसात कोटींचं घर आवाक्याबाहेर, जालन्यातील भाजप आमदाराचा मोठा निर्णय

मुंबई : मुंबई आणि परिसरात स्वस्त किमतीत स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेक जण ‘म्हाडा’च्या घरांच्या लॉटरीकडे डोळे लावून बसलेले असतात. सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच नेते-अभिनेतेही कोट्यातून म्हाडाची घरं मिळवण्यासाठी उत्सुक असतात. जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार नारायण कुचे यांनीही म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला, ते लॉटरीत विजेतेही ठरले. परंतु साडेसात कोटींचा फ्लॅट आवाक्याबाहेर गेल्याने अखेर त्यांनी घरावर पाणी सोडण्याचा निर्णय घेतला.

म्हाडाच्या मुंबई मंडळाची घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याची ओरड होत असतानाच आता आमदारांनाही महागडी घरे परवडत नसल्याचं दिसत आहे. मुंबईतील ताडदेव भागात असलेल्या साडेसात कोटी रुपये किमतीच्या दोन घरांसाठी आमदार नारायण कुचे यांनी अर्ज केला होता. सोडतीत ते विजेतेही ठरले, पण किंमत परवडत नसल्याने त्यांनी दोन्ही घरं परत करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या प्रमाणावर रक्कम जमवू शकत नाही, तसंच तितकं गृहकर्ज मिळणं शक्य नसल्याची खात्री झाल्याने कुचेंनी हा निर्णय घेतला. त्यामुळे आता वेटिंग लिस्टवर असलेले विजेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.

रोहित पवारांनी माझ्या घरी राहावं, सभेत खुशाल विरोधात बोलावं, प्रफुल पटेलांचं ‘आवताण’
म्हाडा मुंबई मंडळाने १४ ऑगस्ट रोजी ४ हजार ८२ घरांची लॉटरी काढली. यासाठी काही लोकप्रतिनिधींनीही आरक्षित प्रवर्गातून अर्ज केले होते. यामध्ये नारायण कुचे, भागवत कराड यांच्यासह काही आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समावेश होता. कुचे आणि कराड यांनी ताडदेवमधील क्रिसेन्ट टॉवर येथील साडेसात कोटी रुपये किमतीच्या घरासाठी अर्ज केला होता.

मी भाजपशी पॅचअप करु शकलो असतो, पण… उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
लोकप्रतिनिधी प्रवर्गात घर होतं एक, तर अर्ज आलेले दोन. लॉटरीत आमदार नारायण कुचे विजेते ठरले. तर कराड प्रतीक्षा यादीत गेले. त्याचवेळी ताडदेवमधीलच साडेसात कोटींच्या अनुसूचित जाती प्रवर्गातील घरासाठीही कुचे विजेते ठरले होते.

इंडिया आघाडीचा लोगो ठरला, ‘भारताची शान’ डिझाईनमध्ये? मुंबईतील बैठकीत मराठमोळे खाद्यपदार्थ
मंडळाने विजेत्यांना ऑनलाईन स्वीकृती पत्र पाठवून घर घेणार की परत करणार, याची विचारणा केली. २७ ऑगस्टपर्यंत याचे उत्तर कळवणे आवश्यक आहे. आपण ताडदेवमधील दोन्ही घरं गुरुवारी परत केल्याचं कुचेंनी म्हाडाला कळवलं. तसंच घरं महाग असून ती सर्वसामान्यांना परवडत नसल्याची नाराजीही व्यक्त केली.

सोडत काढली, नंबर लागला, पैसे भरले पण घरच नाही?; म्हाडाचा अधिकारी गैरहजर, रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध

दरम्यान, नारायण कुचे यांनी दोन्ही घरं परत केल्याने आता प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी मिळेल. लोकप्रतिनिधी प्रवर्गात केंद्रीय मंत्री भागवत कराड वेटिंग लिस्टवर आहेत. कराड यांनीही जर घर नाकारलं, तर या घरासाठी सर्वसाधारण वर्गातील प्रतीक्षा यादीवरील विजेत्याला संधी दिली जाईल. त्यानीही घर नाकारलं तर फ्लॅट विक्रीअभावी तसाच ठेवून पुढील सोडतीत समाविष्ट केला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed