• Thu. Mar 19th, 2026

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांची २५, २६ व २८ ऑगस्टला मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 24, 2023
    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांची २५, २६ व २८ ऑगस्टला मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. 24 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे (आयटीआयचे) संचालक दिगांबर दळवी यांची मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.

    शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागांतर्गत येणाऱ्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील युवकांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यात अनेक ठिकाणी आयटीआयचे प्रशिक्षण केंद्र सुरू असून या केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण दिले जाते, विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्यासाठी अर्ज कुठे व कसा करावा, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर युवकांना रोजगाराची संधी कशाप्रकारे उपलब्ध करून दिली जाते याबाबतची माहिती, संचालक दिगांबर दळवी यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमाच्या माध्यमातून दिली आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शुक्रवार दि.25, शनिवार दि.26 आणि सोमवार दि. 28 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    ००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed