• Sat. Sep 21st, 2024
पुणे-मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार! मिसिंग लिंक लोकार्पण कधी, दादा भुसेंकडून अपडेट

पुणे : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवे वर जी वाहतूक कोंडी होते त्याचा प्रश्न मिसिंग लिंकमुळे कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. समृध्दी महामार्ग आपल्या भिवंडीपर्यंत जोडला गेला की एन एच ३ वरची वाहतूक याच्यावर परावर्तित होईल. यामुळे वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघेल, असं दादा भुसे म्हणाले. महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची कामं सुरू असल्याने महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. सरकारकडून प्रकल्प पुढे न्याचे काम सुरू असून विकासाच्या दृष्टीने लौके उचलली जात असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले. लोणावळा परिसरात सुरू असलेल्या मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी केल्यानंतर दादा भुसे माध्यमांशी बोलत होते. मिसिंग लिंकचं काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई पुणेच्या प्रवासासाठी लागणारा वेळ अर्ध्या तासानं कमी होईल, असं दादा भुसे म्हणाले.

४० भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्‍टर-ट्रॉली नदीत उलटली, ९ जणांचा मृत्यू, एक अल्पवयीन बेपत्ता
दादा भुसे यांनी टनेलच्या कामाची पाहणी केली, त्या टनेलचं ७५ ते ८० तक्के काम पूर्ण झालेले आहे. आतापर्यंतचा सर्वांत रुंदी आणि लांबी असलेला रस्त्यावरचा हा टनेल आहे, असं भुसे म्हणाले. या टनेल मुळे मुंबई – पुणे रस्त्याचं अंतर सहा किमीनं कमी होणार आहे.त्यामुळे अर्धातास वेळ वाचणार आहे. दोन ते तीन तास पुण्यातून मुंबईला पोहोचायला लागतात. त्यात अर्धा तासाची बचत होणार आहे. या मध्ये सर्वात उंच सुमारे १८० मी उंचीचा पुल या ठिकाणी उभारला जातो आहे. जगातील आधुनिक तंत्रज्ञान वापरून या मिसिंग लिंकच काम सुरु आहे. २४ सप्टेंबर २०२४ पर्यंत याचे लोकार्पण होणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.
सना खान मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट; पोलिसांनी काँग्रेस आमदाराला चौकशीला बोलावलं, कारण…

माझ्या वक्तव्याचा विपर्यास..: भुसे

कांद्यावरून सध्या राज्याचे राजकारण सुरू आहे. त्यातच दादा भुसे यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकारण चांगलेच तापले होते. त्यावरून दादा भुसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझं इतकेच सांगणं आहे की, आपण शेतकऱ्याची मुल आहोत. शेतकऱ्यांच्या मुलांना त्याचा मोबदला मिळावा एवढीच त्या मागची भावना होती,असे दादा भुसे यांनी सांगितले.

इंडिया आघाडीचा लोगो ठरला, ‘भारताची शान’ डिझाईनमध्ये? मुंबईतील बैठकीत मराठमोळे खाद्यपदार्थ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed