• Sat. Sep 21st, 2024
तक्रारदाराची भारी खेळी, तडजोडीचं नाटक; लाच घेताना पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ अटक

जालना : जमिनीच्या वादाबाबात केलेल्या अर्जाची चौकशी करुन तक्रारदाराच्या बाजूने मदत करण्यासाठी जालन्यातील पोलिसाने लाच मागितली. ३० हजार रुपयांची लाच स्वीकारणारा अंबड पोलिस ठाण्याचा पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अलगद सापडला.

याविषयी अधिक माहिती अशी, की तक्रारदार यांच्या मालकीची गट क्रमांक ७१८ शिवार, निहालसिंग वाडी येथे शेती आहे. या ठिकाणची ५ एकर २९ गुंठे जमीन त्यांनी हारणे यांना पाच लाख रुपये देऊन इसार पावती करून दिली होती. पण या जमिनीचा वाद विवाद होऊन पोस्टे अंबड येथे अर्ज दाखल करण्यात आला होता.

त्या अर्जाची चौकशी करून तक्रारदार यांच्या बाजूने मदत करून देण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक योगेश हरी चव्हाण, नेमणूक जामखेड बीट ता. अंबड यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजारांची लाच मागितली होती. पण तक्रारदार लाच देण्याच्या या प्रकाराबद्दल नाराज होते.

पोलीस पत्नीला ड्युटीवरुन आणलं, मोठ्या मुलीला शाळेत सोडलं; जिथे ‘हृदय’, तिथेच नवऱ्याने दोघींना संपवलं
लाच दिली नसल्याने काम होईना. त्यामुळे तक्रारदार त्रस्त झाले होते. अखेर त्यांनी पण चाल खेळली. पोलिस उपनिरीक्षकाशी तडजोडीचे नाटक केले आणि तडक लाचलुचपत खात्याला तक्रार दिली. तडजोडी अंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते. पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांनी मित्रामार्फत आधीच १० हजार रुपये १७ ऑगस्ट रोजी स्वीकारले होते, पण उर्वरित पैशांच्या मागणीसाठी चव्हाण यांनी तगादा लावला होताच.

गाडीत पैशांवरुन वाद, सराईत गुंडाचा भररस्त्यात खून, पिंपरीत फिल्मी थरार
तक्रारदाराच्या अर्जावरुन औरंगाबाद येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक फुला यांनी सापळा लावला, आणि या सापळ्यात पोलीस निरीक्षक चव्हाण अडकले. त्यांनी पंचासमक्ष अजून ४० हजार रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान तडजोडी अंती ३० हजार रुपये लाचेची रक्कम ठरवून थोड्या वेळातच ३० हजार रुपये पंच साक्षीदार समक्ष पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली.

प्रेमात अडथळा, आईसोबत सतत भांडण; मुलीनं आई अन् प्रियकराच्या मदतीने वडिलांचा काटा काढला

सापळा पथकात पोहेकॉ. शिरीष वाघ, पोना, राजेंद्र सिनकर, पो.शि. चांगदेव बागुल आदींचा समावेश आहे. चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई दि २३ ऑगस्ट रोजी करण्यात आली. ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे व पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed