• Sun. Sep 22nd, 2024
ऐकावे ते नवलचं! सांगलीत भरणार पक्ष्यांची निवडणूक; आचारसंहिता लागू, ‘अशी’ असणार मतदान प्रक्रिया

सांगली: आजपर्यंत आपण लोकसभा, विधानसभा, महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, ग्रामपंचायत एवढेच काय तर कॉलेजच्या निवडणुका पहिल्या आहेत. मात्र, सांगली शहरात एक अनोखी निवडणूक पार पडत आहे. त्याचे नाव आहे शहर पक्षी निवडणूक २०२३ असं आहे. या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून ३, १०, १७ आणि २४ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये कोणत्या पक्षीला जास्त मतदान पडेल तो सांगलीचा पक्षी म्हणून जिंकेल. महाराष्ट्र राज्य पक्षी संमेलन संस्थेच्या वतीने ही निवडणूक पार पडत आहे.
तरुण शेतकऱ्याची कमाल! कृषी पदवीनंतर शेतीच्या ओढीमुळे भाजीपाल्याची लागवड, आता घेतोय लाखोंचे उत्पन्न
महाराष्ट्रात हजारो जातीचे पक्षी आणि प्राणी मुक्त विहार करताना आपणास दिसतात. काही परदेशी पाहुणे देखील नदीच्या काठांवर विराजमान होतात. अशातच पक्षांच्या नावाने शहरांची ओळख व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य पक्षी संमेलन संस्थेच्यावतीने अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सांगली महानगरपालिका शहर पक्षी (सिटी बर्ड) निवडणूक २०२३ साठी संस्थेतील तज्ञ लोकांनी तांबट, शिक्रा उर्फ ससाणा, हळदी कुंकू बदक, भारतीय राखी धनेश आणि दयाळ या पाच पक्षांची निवड केली आहे. हे पाच पक्षी नागरिकांनी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पाहून त्या पाच पैकी एका पक्षाला एक मत द्यायचे आहे. यासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. यामध्ये शहरातील सर्व नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शहर पक्षी निवडणुकीसाठी मतदान संस्थेने दिलेल्या ठिकाणी जाऊन पक्षी निरीक्षण करून यातील पक्षी पाहून करायचे आहे. पक्षीनिरिक्षण ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक असणार आहेत. ते नागरिकांना मार्गदर्शन करतील. सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक रविवारी पक्षी निरीक्षणाच्या ठिकाणी नागरिकांनी हजर राहून ते पक्षी प्रत्यक्षात पाहून अथवा फोटो पाहून मत नोंदवायचे आहे. त्याबद्दल त्यादिवशी उपस्थित असणारे तज्ञ मार्गदर्शक मतदारांना त्याबद्दल माहिती देतील. तदपूर्वी सर्व मतदारांनी उमेदवारी लढवणाऱ्या पक्षांबद्दल माहिती वाचून आणि फोटो बघून यावे लागणार आहे.

दोन्ही पायांनी दिव्यांग, आर्थिक चणचण; परिस्थितीवर मात करत MPSC परीक्षेत राज्यात सहावा

मतदान हे बॅलेट पेपरवर असेल. एका व्यक्तीला एका दिवशी एकच मतदान करता येईल. मतदानाची तारीख आणि वेळ दिनांक ३, १०, १७ व २४ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत होणार आहे. प्रत्यक्ष स्थळी पक्षी पाहून मतदान होईल. ज्या पक्षाला सर्वाधिक मते मिळतील तो पक्षी शहर पक्षी म्हणून घोषित होईल. या निवडणुकीसाठी मतदार हा सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील असावा. यासाठी वयाची अट हि १० वर्षा पुढील सर्वांसाठी आहे. लिंगायत स्मशानभूमी. हरिपूर, शामरावनगर, शांतीनिकेतन शाळा परिसर, विलिंग्डन महाविद्यालय, सांगली, चिंतामण महाविद्यालय, सांगली, राजर्षी छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ अॅग्री बिझिनेस मॅनेजमेंट, सांगली आणि आमराई येथे पक्षी निरीक्षण आणि मतदान पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed