• Wed. Nov 13th, 2024

    बाळासाहेबांनी जे केलं होतं ते उद्धव ठाकरे करणार, सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाबाबत ठरलं…

    बाळासाहेबांनी जे केलं होतं ते उद्धव ठाकरे करणार, सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघाबाबत ठरलं…

    मुंबई : उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात येत आहे. आज शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बारामती लोकसभा मतदारसंघांमधील पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत भूमिका स्पषट करण्यात आली आहे. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आपण इंडिया आघाडीसोबत असल्यानं सुप्रिया सुळे यांना बळ द्या, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

    राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी आज घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाची स्थिती संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेते पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. आपण इंडिया आघाडीमध्ये असल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांना आपल्या पक्षाकडून ताकद द्या, त्यांना साथ द्या, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी नेत्यांना केल्या आहेत.

    बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद किती आहे यासंदर्भात विधानसभा निहाय सुद्धा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला.
    राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द, ४५ वर्षापूर्वी मंजूर कायदा, पण…

    खडकवासला मतदारसंघ मागणार?

    उद्धव ठाकरे यांनी या लोकसभा मतदारसंघात आपण कोणत्या विधानसभा जागांसाठी विचार करू शकतो या संदर्भात नेत्यांना विचारणा केली. खडकवासला विधानसभा मतदारसंघाची जागा ठाकरे गटाला मिळावी अशी इच्छा स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आजच्या बैठकीत व्यक्त केली आहे. या लोकसभा मतदारसंघात आपण इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देणार असू तर खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आपण प्रयत्न करायला हवा असं म्हणणं नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे समोर मांडलं आहे.
    Monsoon Review : राज्यात यंदा किती पाऊस पडला ते शेतीची स्थिती, कृषी विभागानं शिंदे सरकार पुढं मांडली आकडेवारी

    चार मतदारसंघांचा उद्या आढावा

    उद्धव ठाकरेंच्या लोकसभा मतदार संघ निहाय आढावा बैठकांचा पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस उद्या आहे. उद्या कोल्हापूर, सांगली, सातारा, हातकणंगले या चार लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे घेणार आहेत. या चार मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघात सेनेचे उमेदवार विजयी झाले होते. साताऱ्याची जागा शिवसेनेकडे होती. ती उद्धव ठाकरे यांनी २०१९ च्या पोटनिवडणुकीत भाजपसाठी सोडली होती. धैर्यशील माने आणि संजय मंडलिक हे दोन्ही खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानं ठाकरे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
    आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी…

    सेनाभवनाबाहेर रश्मी ठाकरे महिलांच्या घोळक्यात; फोटो देत आपुलकीने विचारपूस

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed