• Wed. Nov 27th, 2024

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये; इतक्या महिलांना मिळाला रोजगार

    महाराष्ट्रातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये; इतक्या महिलांना मिळाला रोजगार

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यातील सर्वांत मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प नाशिकमध्ये उभारण्यात आला आहे. मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पसमध्ये उभारलेल्या या प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन तब्बल शंभर टनांची असून, या प्रकल्पात काजूनिर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेलनिर्मितीही सुरू करण्यात आली आहे.

    द्राक्ष व फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने हा प्रकल्प उभारला आहे. कंपनीने कोकण व आदिवासी पट्ट्यातील महत्त्वाचे पीक असलेल्या काजूच्या मूल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील, तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्याचे अर्थकारण या प्रकल्पामुळे उंचावण्यास मदत होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे म्हणाले, की जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण आघाडीवर आहोत. मात्र, तरीही देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे या शेतीत व व्यापारात वाढीला संधी आहे. महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगांतील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूमुळे आर्थिक क्रांती घडविण्याची संधी आहे. या संधीचे रुपांतर ताकदीच्या मूल्यवर्धित साखळीत करण्याची गरज आहे. त्यासाठी ‘सह्याद्री’ने ही सुरुवात केली आहे.
    चंद्रपूरातील वाघांची ‘सह्याद्री’त डरकाळी! ८ वाघांचे लवकरच स्थलांतर होण्याची शक्यता
    स्थानिक ठिकाणीच रोजगारसंधी

    काजूची सरासरी उत्पादकता वाढविण्याबरोबरच दुसरीकडे काजू गर व बोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठे प्रकल्प उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे. यातून केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांचेच उत्पन्न वाढणार नाही, तर गावातच रोजगारसंधी निर्माण झाल्यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावांत स्थिरावणार आहे. त्यासाठी काजू पिकाची मूल्यसाखळी उभारण्यावर ‘सह्याद्री फार्म्स’ भर देणार आहे.

    -प्रतिदिन शंभर टन कच्चे काजू हाताळणीची प्रकल्पात क्षमता
    -देशातला ‘टॉप १०’मधील व राज्यातील सर्वांत मोठा प्रकल्प
    -काजू प्रक्रियेसंदर्भातील सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी
    -काजू कवचापासून तेल काढणीचा २० टन क्षमतेचा प्लॅन्ट
    -उत्पादन गुणवत्तेच्या बीआरसी उच्च मानकांच्या समकक्ष व्यवस्थापन
    -परिसरातील तीनशेहून अधिक महिलांना कायमस्वरूपी रोजगार

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed