• Sat. Sep 21st, 2024

महामंडळाचा भोंगळ कारभार! बसमध्ये वृद्ध आणि विद्यार्थी; एसटीचा स्टेरिंग रॉड अचानक लॉक अन्…

महामंडळाचा भोंगळ कारभार! बसमध्ये वृद्ध आणि विद्यार्थी; एसटीचा स्टेरिंग रॉड अचानक लॉक अन्…

बुलढाणा: आज पुन्हा एकदा सर्वसामान्यांची लाल परी विद्यार्थी आणि वृद्ध प्रवासी घेऊन प्रवास करत असताना अचानक स्टेरिंग रोड लॉक झाल्याने एसटी पलटी झाली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा नादुरुस्त कारभार चव्हाट्यावर आला. रस्ते अपघातापाठोपाठ एक प्रकारे अपघाताची स्पर्धा करण्यामध्ये सर्वसामान्यांची लाल परीदेखील मागे नाही, असेच म्हणावे लागेल. कारण समृद्धी महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीस्वार यांचे होणारे अपघात त्या पाठोपाठ एसटीचे अपघात समोर येणे नित्याचे झाले आहे.
Sindhudurg Accident : भरधाव एसटी बसची पिकअप टेम्पोला धडक; ११ प्रवाशी जखमी, वाहनांचे मोठे नुकसान
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी सवणा येथून बस क्र. एमएच २० डी ९३६७ ही चिखली येथे जात होती. दरम्यान सकाळी एसटी पलटी झाली. त्या एसटीत विद्यार्थी असल्याची माहिती मिळाल्यानंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघात झालेला रस्ता अरुंद असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला छोटी मोठी झुडपे आली आहेत. एसटी एका खड्ड्यात पलटी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आणि प्रवाशांना किरकोळ जखम झाली आहे, त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडून देण्यात आले आहे.

चालक नाही हा परमेश्वरच; प्रसंगावधान दाखवलं, जीव वाचवला, प्रवाशांकडून कौतुक

एसटी बस दुपारपर्यंत तिथून बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती समजली आहे. अपघात झालेल्या एसटीत जवळपास २५ च्या पुढे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. हे विद्यार्थी खाजगी शिकवणी करता निघाले होते. जखमी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटीचा चालक सुध्दा गंभीर जखमी झाला असून एसटीचं स्टेरिंग लॉक झाल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे चालकाने सांगितलं आहे. काही विद्यार्थी गंभीर असल्यामुळे पालक चिंतेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed