• Sun. Sep 22nd, 2024

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गाडी थांबवून तरुण-तरुणीला मारहाण; ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मुंबईत वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर गाडी थांबवून तरुण-तरुणीला मारहाण; ३ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

मुंबई: रविवारी पहाटे मुंबईमधील जोगेश्वरी पूर्व याठिकाणी धक्कादायक प्रकार घडला. अभिषेक मलिक नावाच्या एका व्यक्तीवर आणि त्यांच्या मैत्रिणीवर वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तिघांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला. मलिक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, या प्रकरणात पोलिसांनी अद्याप कोणाला अटक केलेली नसली तरी त्याने त्या तिघांपैकी एका आरोपीची ओळख पटवली आहे. तो एका निर्मात्याचा मुलगा असल्याचे त्याचे म्हणणे आहे. अभिषेक यांनी असेही म्हटले की, या हल्ल्यामागील नेमके कारण काय आहे हे त्यालाही माहीत नाही. कारण त्या लोकांशी त्याचे कोणतेही पूर्वीचे वैमनस्य नाही आहे.

दरम्यान पोलीस उपायुक्त (झोन X) डी नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात व्यक्तींविरोधीत भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गंभीर दुखापत करणे आणि धमकी देण्यासंबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जोगेश्वरी पोलिसांनी अशी माहिती दिली की, ते आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून घटनेविषयी अधिक तपास सुरू आहे.

मुंबईतल्या वांद्रेतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, चिकन थाळीमध्ये चक्क उंदराचं पिल्लू…
अभिषेक यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले की, विलेपार्ले याठिकाणी असणाऱ्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवल्यानंतर तो त्याच्या मैत्रिणीला घरी सोडण्यासाठी निघाला होता. पहाटे ३.४० च्या सुमारास शंकरवाडी बस स्टॉपजवळ त्याच्या बीएमडब्ल्यूसमोर एक कार अचानक येऊन थांबली. पश्चिम द्रुतगती महामार्गावर हा बसस्टॉप आहे. त्याने TOI शी बोलताना असे म्हटले की, ‘पुढच्या सीटवर बसलेल्या एका व्यक्तीने मला थांबण्याचा इशारा केल्यानंतर मी गाडी थांबवली. तो त्याच्या कारमधून बाहेर पडला आणि माझ्या कारवर विनाकारण मारायला सुरुवात केली. जेव्हा मी खिडकी खाली केली, तेव्हा त्याने मला शिवीगाळ केला.’

मलिक असेही म्हणाले की, जेव्हा त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी ते त्यांच्या कारबाहेर पडले तेव्हा संबधित आरोपीने त्यांच्या कानखाली मारली. त्यावर त्यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यांनी पुढे असे म्हटले की, ‘यानंतर कारमधील इतर दोन माणसे खाली उतरली आणि त्यांनी मला मारायला सुरुवात केली. त्यांनी शिवीगाळही केली, माझ्या मैत्रिणीने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी तिलाही धक्काबुक्की केली आणि लाथ मारली.’ मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार यानंतर ते निघून गेले.

हायकोर्टाने झापलं पण तरीही BMC उघड्या मॅनहोलबाबत गंभीर नाहीच, ‘मृत्यूगोला’चा धोका कायम
मलिक आणि त्यांची मैत्रीण आधी आंबोली पोलीस ठाण्यात गेले होते. त्याठिकाणी दोघांवर प्राथमिक उपचार केले गेले आणि नंतर घटनास्थळी नेण्यात आले. आंबोली पोलील त्यांना यानंतर जोगेश्वरी पोलीस ठाण्यात घेऊन गेले, कारण जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणी जोगेश्वरी पोलीस अधिक तपास करत आहेत.

तरुणीवरील हल्ल्याने पुणे सुन्न! बचावास गेलेले अनेक जण जखमी; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरारक अनुभव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed