• Mon. Nov 25th, 2024
    मुंबईतल्या वांद्रेतील प्रसिद्ध हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार, चिकन थाळीमध्ये चक्क उंदराचं पिल्लू…

    मुंबई : वांद्रे येथील एका प्रसिद्ध हॉटेलच्या चिकन थाळीमध्ये उंदराचे पिल्लू सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्राहकाच्या तक्रारीवरून याबाबत वांद्रे पोलिसांनी उंदराचे मास खायला देऊन जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी हॉटेलचा मॅनेजर, आचारी आणि हॉटेलसाठी कोंबडी पुरविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

    एका खासगी बँकेत वरिष्ठ पदावर काम करणारे अमित (बदललेले नाव) हे आपल्या मित्रांसोबत १३ ऑगस्ट रोजी वांद्रे पश्चिमेकडील पाली नाका येथील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. या हॉटेलमध्ये चिकन आणि मटण थाळी प्रसिद्ध असल्याने त्यांनी दोन्ही थाळ्यांची ऑर्डर दिली. टेबलावर आलेल्या थाळीमध्ये त्यांच्या हाताला मांसाचा वेगळा तुकडा हाताला लागला. कोंबडीचा तुकडा वाटत नसल्याने त्यांनी निरखून पाहिले असता ते उंदराचे लहान पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. ही बाब त्यांनी तात्काळ हॉटेलच्या मॅनेजरच्या लक्षात आणून दिली. हॉटेल कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने अमित यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेतली.

    ‘साहेबांचे आशीर्वाद हीच आमची शक्ती’, अजितदादा-प्रफुलभाईंना नेमकं काय म्हणायचंय?
    मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने फार गंभीर असल्याने वांद्रे पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली. अमित यांनी दिलेल्या तक्रारीवरून हॉटेलचा मॅनेजर, अन्न पदार्थ तयार करणारा आचारी आणि या हॉटेलला कोंबडी पुरवणाऱ्याच्या विरोधात भादंवि कलम २७२, ३३६ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक केलेली नसून, मांसाचा तुकडा तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. लॅबचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी म्हटले आहे.

    Sharad Pawar: केंद्रीय कृषीमंत्रीपद किंवा निती आयोगाचे अध्यक्षपद; गुप्त बैठकीत अजितदादांची शरद पवारांना ऑफर?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed