औरंगाबाद, दि. 15 (जिमाका) – पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्यानाचे नूतनीकरण व सुशोभिकरणा’च्या कामाचा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील, विधान सभा सदस्य आमदार प्रदीप जैस्वाल, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, म.न.पा. आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस आयुक्त मनोज लोहिया,पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांची उपस्थिती होती.
प्रस्तावित उद्यानात लहान मुले, तरुण पिढी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या पर्यटनाच्या सुविधा उभारण्यात येतील. तसेच संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ यांच्या जीवन कार्याची ओळख या उद्यानाच्या माध्यमातून व्हावी. तसेच अंजिठा वेरुळ या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठीही आणखी एक पर्यटनस्थळ व्हावे,असे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी सांगितले.
बैठकीनंतर ब्रह्मगव्हाण जल उपसा सिंचन प्रकल्पातील भाग-2 मधील मौजे राहटगाव व सोलनापूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मावेजा धनादेश वाटप करण्यात आले. कृष्णा जगन्नाथ नाटकर, शाहुराव सुर्यभान सातपुते, रेणुका वाकडे, श्रीहरी खराद, रामचंद्र सातपुते, दुर्गा खराद तसेच मौज राहटगाव मधील जानकाबाई इरतकर,संध्याबाई शिंदे, महादेव खरसाडे, शिवाजी गोधडे इ. धनादेश वाटप करण्यात आले.
00000