• Sat. Sep 21st, 2024

देशातील ९५४ पोलीसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ ७६ जणांचाही समावेश

देशातील ९५४ पोलीसांना राष्ट्रपती पदके जाहीर; महाराष्ट्रातील ‘या’ ७६ जणांचाही समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशभरातील ९५४ पोलिसांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सोमवारी राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. पोलिस दलात केलेले शौर्य, उल्लेखनीय सेवा आणि गुणवत्तापूर्वक कामगिरीबद्दल महाराष्ट्रातील ७६ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे. राज्यातील पदक विजेत्यांमध्ये अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके, विनय चौबे, वाहतूक शाखेचे सहआयुक्त प्रवीण पडवळ, उपायुक्त विजय पाटील या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

पोलिससेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी राज्यातील प्रवीण साळुंके, विनयकुमार चौबे आणि जयंत नाईकनवरे यांना राष्ट्रपती पदके जाहीर करण्यात आली. ४० पोलिसांचा गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदके देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये वाहतूक शाखेचे सहआयुक्त प्रवीण पडवळ, उपायुक्त विजय पाटील, राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनपुडे पाटील, अधिकराव पोळ, माया मोरे, आनंद वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल काटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख हमीद शेख, सुनील नवार, संजय माळी, अंबादास हुलगे, शामराव गडाख, मोहन डोंगरे, नागनाथ फुटाणे, विजय आवकीरकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर, कैलास नागरे आणि महादेव पाटील यांचा समावेश आहे.

३३ पोलिसांना शौर्यपदके

राज्यातील ३३ पोलिसांना शौर्यपदके जाहीर झाली असून यामध्ये रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुग्साय आसाराम नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसरू कोरेटी, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, चंद्रकांत उके, महारु कुळमेथे, पोडा अत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देविदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेटी, हेमंत कोडप, किरण हिचामी, वारलू अत्राम, माधव तिम्मा, नरेश सिदाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार यांचा समावेश आहे.
गडचिरोली पोलिसांचा गौरव; ३३ पोलीस अधिकारी, अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक जाहीर
उपमुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन

महाराष्ट्र पोलिस दलातील ७६ अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस पदक, पोलिस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलिस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची क्षमता, गुणवत्ता, दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पदकविजेत्या पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दांत पवार यांनी सर्वांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed