• Sun. Sep 22nd, 2024

काँग्रेसचं ठरलं; धाराशिव लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल?, अमित देशमुख यांनी जाहीर केलं

काँग्रेसचं ठरलं; धाराशिव लोकसभेसाठी उमेदवार कोण असेल?,  अमित देशमुख यांनी जाहीर केलं

धाराशिव : काँग्रेस पक्षातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्या भावनेचा विचार करता आगामी होणार लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून उमेदवार दिला जाईल. तसा ठराव धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतला असून प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नावाची शिफारस उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस कमिटीने ठरावाद्वारे प्रदेश कमिटीकडे केली आहे. या वर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे वक्तव्य काँग्रेसचे माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी धाराशिव येथे केलंय.

धाराशिव येथील वैद्यकीय महाविदयालयाला मंजुरी महाविकास आघाडीच्या काळात मिळाली आहे. तसेच धाराशिव – तुळजापुर – सोलापूर रेल्वेसाठी महाविकास आघाडीने पाठपुरावा केला होता. निधी उपलब्ध करुन दिला होता. कृष्णा खोऱ्यातील २१ टिएमसी पाणी दिवंगत विलास देशमुख यांनी मंजुर केले होते. यासाठी माजी मंत्री मधुकर चव्हाण यांनी पाठपुरावा केला होता.

IND vs Malasia : हॉकीत भारताची ऐतिहासिक कामगिरी, मलेशियाला धूळ भारतानं चौथ्यांदा पटकावली ट्रॉफी
धाराशिव येथील वैदयकिय महाविदयालय, धाराशिव – तुळजापुर रेल्वे, कृष्णा खोऱ्यातील २१ टिएमसी पाणी भाजपाने मंजूर केलंय. याचे श्रेय भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील हे घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.

Loan becoming expensive; आरबीआयने तर व्याजदरात वाढ केलेली नाही, मग कर्ज का होतंय महाग?
आमदार अमित देशमुख यांच्या या वक्तव्यामुळे आता धाराशिवच्या राजकारणाला नवा ट्विस्ट येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed